ऑनलाइनमुळे कारभार गतिमान

By Admin | Updated: September 7, 2014 01:50 IST2014-09-07T01:50:05+5:302014-09-07T01:50:05+5:30

राज्य शासनाने सर्व कारभार पारदर्शक करण्यासाठी गेल्या काही वर्षात व्यवस्थेत आमूलाग्र बदल केला आहे.

Online running speed | ऑनलाइनमुळे कारभार गतिमान

ऑनलाइनमुळे कारभार गतिमान

पनवेल : राज्य शासनाने सर्व कारभार पारदर्शक करण्यासाठी गेल्या काही वर्षात व्यवस्थेत आमूलाग्र बदल केला आहे. त्याचा एक भाग म्हणून महसूल विभागाने इन लाइन संस्कृती मोडीत काढण्यासाठी ऑनलाइन यंत्रणा विकसित केली असून, जनतेच्या कामांना विलंब लागणार नसल्याचा विश्वास महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला. 
पनवेल तालुका प्रशासकीय भवनचे भूमिपजून थोरातांच्या हस्ते शनिवारी झाले, या वेळी ते बोलत होते. फडके नाटय़गृहात पार पडलेल्या या सोहळय़ाला माजी खासदार रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, कोकण म्हाडाचे अध्यक्ष माणिकराव जगताप, प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मुश्ताक अंतुले, काँग्रेस जिल्हाध्यक्ष आर. सी़ घरत, कामगार नेते महेंद्र घरत, नगराध्यक्षा चारुशीला घरत, जिल्हाधिकारी सुमंत भांगे, कोकण विभागीय उपायुक्त कैलास जाधव, प्रातांधिकारी सुदाम परदेशी यांच्यासह पदाधिकारी, नगरसेवक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. 
महसूल विभागाचे कामकाज संगणकीकृत केले जात आहे. सातबारा, अधिवास, फेरफार, अदालत, चावडी वाचन यांसारखे कार्यक्रम विभागाकडून राबवले जातात. त्यामुळे कामांचा निपटारा जलदगतीने होत असून, जनतेला फायदा होत असल्याचा दावाही थोरात यांनी केला. सुवर्ण राजस्व अभियानांतर्गत पहिल्याच वर्षी 42 हजार नागरिकांना दाखले वितरीत करण्यात आले. आजतागायत 1 कोटी 63 लाख दाखल्यांचे वाटप करण्यात असून या कार्यक्रमाची नोंद लिम्का बुकात झाली असल्याचेही ते म्हणाले. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठपुराव्यामुळे प्रशासकीय भवन उभे राहणार आहे. या तरुण आमदाराच्या माध्यमातून या भागाचा झपाटय़ाने विकास होत असल्याचेही महसूल मंत्री म्हणाले. (वार्ताहर) 
 
च्प्रस्तावित प्रशासकीय इमारतीच्या बांधकामामध्ये आणखी चटईक्षेत्र शिल्लक आहे. त्यामध्ये दोन मजली वाढवता येणो शक्य असल्याची माहिती आ. प्रशांत ठाकूर यांनी बाळासाहेब थोरात यांना दिली. 
च्या संदर्भात प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना त्यांनी जिल्हाधिकारी भांगे यांना दिल्या. त्याचबरोबर इंटिरिअर आणि वाढीव बांधकामासाठी सुमारे 1क् कोटींची तरतूद आचारसंहिता जाहीर होण्याच्या आगोदर करण्याची ग्वाहीही थोरात यांनी दिली 
च्सुवर्ण राजस्व अभियानांतर्गत विविध कार्यक्रम राबवून हा विभाग अधिकाधिका लोकाभिमुख केला. 
च्प्रशासकीय भवनबाबत तातडीने पावले उचलल्याबद्दल आ. ठाकूर यांनी महसूल मंत्र्यांचे आभार मानले. जिल्हाधिकारी सुमंत भांगे यांनी प्रस्ताविकात प्रशासकीय भवनबाबत माहिती दिली.

 

Web Title: Online running speed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.