Join us  

म्हाडा संक्रमण शिबिरामध्ये आता ऑनलाइन भाडे वसुली

By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2019 5:32 AM

मुंबई : विविध प्रकल्पांतर्गत बाधित झालेल्या आणि आपत्कालीन दुर्घटनेमध्ये घर गेलेल्या नागरिकांच्या पुनर्वसनासाठी शासनाने म्हाडाच्या संक्रमण शिबिराची उभारणी केली ...

मुंबई : विविध प्रकल्पांतर्गत बाधित झालेल्या आणि आपत्कालीन दुर्घटनेमध्ये घर गेलेल्या नागरिकांच्या पुनर्वसनासाठी शासनाने म्हाडाच्या संक्रमण शिबिराची उभारणी केली आहे. मात्र शिबिरात होत असलेली घुसखोरी रोखण्यासाठी, त्यातील भ्रष्टाचार रोखण्यासाठी आणि ऑनलाइन भाडे वसुलीसाठी म्हाडानेऑनलाइन भाडे वसुलीची यंत्रणा उभारण्याचा निर्णय घेतला आहे. यातून पारदर्शकता निर्माण करण्यात येत असल्याचा म्हाडाचा दावा आहे.

विविध भागांमध्ये म्हाडाच्या एकूण ५६ वसाहती आहेत. यामध्ये एकूण २२ हजार कुटुंबीय आहेत. त्यामध्ये ८ हजार ५०० कुटुंबे घुसखोर आहेत. हे घुसखोर या ठिकाणी फुकटात राहत असून म्हाडाचे भाडेही भरण्यास तयार नाहीत. तर खरे रहिवासी दरमहा म्हाडाला पाचशे रुपये भाडे भरत आहेत. घुसखोरांकडून रहिवाशांना अनेक प्रकारे त्रास होतो. तसेच भाडे वसूल करणाऱ्या म्हाडा अधिकाऱ्यांवर हे घुसखोर हल्लाही करत असतात. हे सर्व रोखण्यासाठीआणि संशयातीत स्थिती बदलण्यासाठी म्हाडाच्या इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाने बायोमेट्रिक पद्धत सुरू केली आहे. या माध्यमातून संक्रमण शिबिरात नेमके कोण राहतो तसेच त्यात रहिवाशांचे होणारे बदल आणि भाडे न देणारे घुसखोर याची तपासणी होणार आहे. ऑनलाइन भाडे वसुली केल्याने संपूर्ण यंत्रणा कायमस्वरूपी अद्ययावत होणार आहे. ऑनलाइनच्या साहाय्याने मूळ रहिवाशांची नोंद झाल्याने घुसखोरांचा प्रश्न आपसूकच निकालात निघणार आहे. म्हाडाने २००८ मध्ये संक्रमण शिबिरातील रहिवाशांची यादी तयार करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र अद्ययावत पद्धतीने कोणतीही यादी तयार झालेली नसल्याने बायोमेट्रिकपाठोपाठ ऑनलाइन नोंदणीस अनन्यसाधारण महत्त्व लाभणार आहे.

सविस्तर माहिती होणार जमाराज्य सरकारने घुसखोरांना अभय देण्याचे जाहीर केले आहे. तरीही मूळ रहिवाशांची नेमकी यादी ठरवताना ऑनलाइन नोंदणी उपयुक्त ठरणार आहे. ऑनलाइनमुळे म्हाडाकडे रहिवाशांची सविस्तर माहिती जमा होतानाच संक्रमण शिबिरातील मुख्य भाडेकरू, घुसखोर रहिवाशांना मासिक भाडे ऑनलाइन पद्धतीने भरावे लागणार आहे. त्यामुळे घरांची मालकी कोणाकडे, भाडेकरूकोण, त्यात म्हाडाच्या अधिकारी, दलालांनी ताब्यात घेतलेली घरे आदी सर्वांचा लेखाजोखा हाती येईल.

टॅग्स :म्हाडाऑनलाइन