Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई विद्यापीठाची प्रवेशपूर्व ऑनलाइन नोंदणी आजपासून

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2020 03:11 IST

मुंबई विद्यापीठामार्फत प्रवेशपूर्व आॅनलाइन नोंदणी प्रक्रियेचे वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

मुंबई : निकाल लागला, मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पदवी प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होईल की नाही आणि झालीच तर कशी, असे अनेक प्रश्न विद्यार्थी, पालकांसमोर आहेत. मात्र मुंबई विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मुंबई विद्यापीठाची प्रवेशपूर्व आॅनलाइन नाव नोंदणीची प्रक्रिया शुक्रवारपासून सुरू होत असल्याचे जाहीर केले आहे. सोबतच मुंबई विद्यापीठामार्फत प्रवेशपूर्व आॅनलाइन नोंदणी प्रक्रियेचे वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

टॅग्स :मुंबई विद्यापीठ