बँकेतून बोलत असल्याचे सांगून ऑनलाइन गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:10 IST2021-02-06T04:10:43+5:302021-02-06T04:10:43+5:30

मुंबई : बँकेतून बोलत असल्याचे सांगून एका ठगाने मलबारहिल परिसरात राहणाऱ्या आचार्य यांना फाेन केला. त्यांचे एटीएम कार्ड बंद ...

Online gangster saying talking from the bank | बँकेतून बोलत असल्याचे सांगून ऑनलाइन गंडा

बँकेतून बोलत असल्याचे सांगून ऑनलाइन गंडा

मुंबई : बँकेतून बोलत असल्याचे सांगून एका ठगाने मलबारहिल परिसरात राहणाऱ्या आचार्य यांना फाेन केला. त्यांचे एटीएम कार्ड बंद करण्यात आल्याची भीती घालून त्यांच्याकडून गोपनीय माहिती घेतली व त्याद्वारे त्यांच्या बँक खात्यातून ऑनलाइन ४९ हजार रुपये परस्पर काढून घेतले. याप्रकरणी मलबारहिल पोलीस अधिक तपास करीत आहेत.

..................................

माहेरहून पैसे आणण्यासाठी विवाहितेचा छळ

मुंबई : माहेरहून पैसे आणण्यासाठी दबाव टाकत शारीरिक आणि मानसिक छळ करून एका विवाहितेला तलाक देण्यात आल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

..................................

व्यावसायिकाची ५० हजार रुपयांना फसवणूक

मुंबई : भाजी कापण्याच्या कटरची ऑर्डर देत व्यावसायिकाची ऑनलाइन फसवणूक केल्याप्रकरणी माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात ठगांनी वडाळा येथील व्यावसायिकाकडून ५० हजार रुपये उकळले आहेेेत.

..........................

Web Title: Online gangster saying talking from the bank