बँक खात्यातील रकमेवर ऑनलाईन डल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:11 IST2021-02-20T04:11:17+5:302021-02-20T04:11:17+5:30

मुंबई : डेबीट कार्डची वैधता वाढवून देण्याच्या बहाण्याने तरुणीच्या बँक खात्यातील रकमेवर ऑनलाईन डल्ला मारल्याप्रकरणी पायधुनी पोलीस ठाण्यात गुन्हा ...

Online check on bank account amount | बँक खात्यातील रकमेवर ऑनलाईन डल्ला

बँक खात्यातील रकमेवर ऑनलाईन डल्ला

मुंबई : डेबीट कार्डची वैधता वाढवून देण्याच्या बहाण्याने तरुणीच्या बँक खात्यातील रकमेवर ऑनलाईन डल्ला मारल्याप्रकरणी पायधुनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात, २६ हजार रुपयांची फसवणुक झाली असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.

.......

विवाहितेचा कौटुंबिक छळ

मुंबई : मूल होत नाही आणि विवाहबाह्य संबंधामुळे पतीने आपला कौटुंबिक छळ केल्याचा आरोप करत ४५ वर्षीय महिलेने पोलिसांत धाव घेतली. त्यानुसार मुलुंड पोलिसांनी गुन्हा नोंद करत अधिक तपास सुरू केला आहे. तसेच स्त्रीधन असलेले १८ लाख ८१ हजार ९२९ रुपयांचे दागिने, चीजवस्तू यांचा अपहार केल्याचेही तक्रारीत नमूद केले आहे.

..

मध्यस्थी करणे बेतले जीवावर

मुंबई : घाटकोपर पूर्वेकडील परिसरात बुधवारी रात्री पावणेनऊच्या सुमारास रामशिरोमणी यादव (५५) आणि पाहिजे आरोपीत वाद सुरू होते. त्याने रागाने भाजी कापण्याच्या सुरीने हातावर वार केले. हे पाहून शशिकांत उर्फ मुन्ना नागेंद्र राय (३५) मध्ये पडला. त्याने भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला. याच दरम्यान आरोपीने त्यांच्या मानेवर सुरीने वार केले. यात त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पंतनगर पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवत तपास सुरू केला.

Web Title: Online check on bank account amount