दहावीचे आजपासून ऑनलाइन अर्ज
By Admin | Updated: August 8, 2014 02:01 IST2014-08-08T02:01:24+5:302014-08-08T02:01:24+5:30
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये घेण्यात येणा:या दहावी परीक्षेचे ऑनलाइन अर्ज भरून घेण्यास उद्यापासून (8 ऑगस्ट) सुरुवात होत आहे.

दहावीचे आजपासून ऑनलाइन अर्ज
>मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये घेण्यात येणा:या दहावी परीक्षेचे ऑनलाइन अर्ज भरून घेण्यास उद्यापासून (8 ऑगस्ट) सुरुवात होत आहे.
दहावी परीक्षेला बसणा:या विद्याथ्र्यासाठी ऑनलाइन परीक्षा अर्ज भरण्याच्या तारखा मंडळाने गुरुवारी जाहीर केल्या आहेत. विद्याथ्र्याना 8 ते 19 ऑगस्टर्पयत शाळांमार्फत ऑनलाइन अर्ज भरता येतील. शाळांनी विद्याथ्र्याच्या याद्या 22 ऑगस्टर्पयत मंडळाकडे सादर करायच्या आहेत. तर 20 ते 26 ऑगस्टर्पयत विद्याथ्र्याना विलंब शुल्कासह अर्ज भरता येणार आहेत. शाळांनी विद्याथ्र्याच्या याद्या 28 ऑगस्टर्पयत मंडळाकडे सादर करायच्या आहेत. दरम्यान, मार्च 2014 परीक्षेत अनुत्तीर्ण विद्याथ्र्याना त्यांची माहिती ऑनलाइनद्वारे अर्जात घेता येणार आहे. (प्रतिनिधी)