रूळ ओलांडल्यास एक हजाराचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2018 06:20 IST2018-06-30T06:19:58+5:302018-06-30T06:20:03+5:30
रेल्वे रूळ ओलांडणाऱ्या प्रवाशांना रोखण्यासाठी रेल्वे प्रशासन रूळ ओलांडणा-या प्रवाशांच्या दंडात चौपट वाढ करण्याच्या तयारीत आहे

रूळ ओलांडल्यास एक हजाराचा दंड
मुंबई : रेल्वे रूळ ओलांडणाऱ्या प्रवाशांना रोखण्यासाठी रेल्वे प्रशासन रूळ ओलांडणाºया प्रवाशांच्या दंडात चौपट वाढ करण्याच्या तयारीत आहे. यामुळे रेल्वे रूळ ओलांडणाºया प्रवाशांना एक हजाराचा दंड आकारण्यात येईल. याचबरोबर, रूळ ओलांडणाºया प्रवाशांवर ‘आॅन द स्पॉट’ कारवाई करण्याचे विशेषाधिकार तिकीट तपासनिसांना देण्यासाठी पश्चिम रेल्वेने प्रस्ताव बोर्डात पाठविला आहे.
नुकतीच रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष अश्वनी लोहाणी मुंबई दौºयावर आले होते. या वेळी पश्चिम रेल्वेच्या विविध प्रकल्पांचा आढावा लोहाणी यांनी घेतला. आढावा बैठकीत रेल्वे प्रशासनाने रेल्वे रूळ ओलांडणाºया प्रवाशांना रोखण्यासाठी प्रस्ताव मांडला.
‘रेल्वे रूळ ओलांडणाºया प्रवाशांचा दंड चौपट करण्यात येईल. यानुसार, रेल्वे रूळ ओलांडणाºयावर थेट एक हजार रुपयांपर्यंत दंड आकारावा. याचबरोबर, रेल्वे रूळ ओलांडणाºया प्रवाशांवर ‘आॅन द स्पॉट’ कारवाई करण्याचे विशेषाधिकार तिकीट तपासनिसांना देण्यात यावे,’ असे प्रस्तावात स्पष्ट करण्यात आले आहे.
मुंबई उपनगरीय रेल्वेवर रेल्वे रूळ ओलांडताना २०१५ साली १ हजार ८०९ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे, तर ४६८ प्रवासी जखमी झाले आहेत. २०१६ मध्ये रूळ ओलांडताना मरण पावणाºया प्रवासी संख्येत वाढ झाल्याने, अपमृत्यूचा आकडा १ हजार ७९८ पर्यंत पोहोचला होता. २०१७ मध्ये एकूण २,०२७ प्रवाशांना रेल्वे रूळ ओलांडताना अपघाताला सामोरे जावे लागले. त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले.
रेल्वे बोर्ड सकारात्मक
मुंबईत झालेल्या आढावा बैठकीत पश्चिम रेल्वेने रेल्वे रुळ ओलांडणाºया प्रवाशांविरुद्ध एक हजार रुपये दंड आकारण्याचा प्रस्ताव सादर केला. बैठकीत रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष अश्वनी लोहाणी यांनी प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. बोर्डाची मंजुरी मिळाल्यानंतर तिकीट तपासनीसांना आॅन द स्पॉट कारवाई करण्याचे विशेषाधिकार देण्यात येईल.
- संजय मिश्रा, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, पश्चिम रेल्वे