Join us  

मोबाईलवर बोलत वाहन चालवल्यास एक हजार रुपये दंड, राज्यात नवीन केंद्रीय मोटार वाहन कायद्याची अंमलबजावणी,असे आहेत नवीन नियम

By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2021 9:53 AM

New Traffic Rules in Maharashtra: राज्यात नवीन केंद्रीय मोटार वाहन कायद्याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय परिवहन विभागाने घेतला असून, अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे वाहतूक नियम उल्लंघनाला चाप बसणार आहे. परिवहन विभागाने १ डिसेंबर २०२१ला अधिसूचना जाहीर केली आहे.

मुंबई :  राज्यात नवीन केंद्रीय मोटार वाहन कायद्याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय परिवहन विभागाने घेतला असून, अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे वाहतूक नियम उल्लंघनाला चाप बसणार आहे. परिवहन विभागाने १ डिसेंबर २०२१ला अधिसूचना जाहीर केली आहे. केंद्र सरकारने मोटर वाहन कायद्यात बदल करून नवीन कायदा आणला आणि त्यातील तरतुदींमुळे दंडाच्या रकमेत मोठी वाढ केली. परंतु महाराष्ट्र सरकारने त्याला विरोध केला. तत्कालीन परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी नवीन मोटर वाहन कायद्यात तूर्तास स्थगिती देत असल्याचे स्पष्ट केले होते. परंतु राज्यात वाहतूक नियमांचे होणारे उल्लंघन आणि वाढते अपघात पाहता परिवहन विभाग नवीन कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी आग्रही होता. त्यानुसार गुरुवारी नवीन नियमांची अधिसूचना जारी झाली.

..असे आहेत नवीन नियम

- बेदरकारपणे आणि धोकादायकरीत्या वाहन चालविल्यास दुचाकीस्वाराला एक हजार रुपये, तर चारचाकी चालकाला दोन हजार रुपये आणि अन्य वाहनांच्या चालकाला चार हजार रुपये दंड आकारण्यात येईल. यापूर्वी दंडाची ही रक्कम ५०० रुपये होती.

- तीन वर्षांत दुसऱ्यांदा गुन्हा घडल्यास दहा हजार रुपये दंड होणार आहे.

- मोबाइलवर बोलताना वाहन चालविल्यास दुचाकीस्वारांना एक हजार रुपये, चारचाकी वाहनचालकाला दोन हजार रुपये आणि अन्य वाहनचालकाला चार हजार रुपये दंड होणार आहे.

- वाहनांना परावर्तक (रिफ्लेक्टर) नसणे, फॅन्सी नंबर प्लेट बसविणे या वाहतूक नियमांविरोधात यापूर्वी २०० रुपये असलेल्या दंडाच्या रकमेत वाढ करून ती एक हजार रुपये करण्यात आली आहे.

- परवाना (अनुज्ञप्ती) नसतानाही वाहन चालविणाऱ्यांकडून पाच हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे.

केंद्र सरकारने मोटर वाहन कायद्यात बदल करून नवीन कायदा आणला आणि त्यातील तरतुदींमुळे दंडाच्या रकमेत मोठी वाढ केली. परंतु महाराष्ट्र सरकारने त्याला विरोध केला. तत्कालीन परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी नवीन मोटर वाहन कायद्यात तूर्तास स्थगिती देत असल्याचे स्पष्ट केले होते. परंतु राज्यात वाहतूक नियमांचे होणारे उल्लंघन आणि वाढते अपघात पाहता परिवहन विभाग नवीन कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी आग्रही होता. त्यानुसार गुरुवारी नवीन नियमांची अधिसूचना जारी झाली.

टॅग्स :वाहतूक कोंडीमहाराष्ट्ररस्ते सुरक्षा