शेअर बाजारात नुकसान झाल्याने एकाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 06:19 AM2019-05-27T06:19:41+5:302019-05-27T06:19:45+5:30

मुलुंडच्या ५२ वर्षीय केतन कुमार मनसुखलाल दोशी यांनी एक्स्प्रेससमोर उडी घेत आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी घडली.

One of the suicides due to stock market loss | शेअर बाजारात नुकसान झाल्याने एकाची आत्महत्या

शेअर बाजारात नुकसान झाल्याने एकाची आत्महत्या

googlenewsNext

मुंबई : निवडणुकीच्या निकालानंतर शेअर मार्केटमध्ये झालेल्या उलाढालीत कोट्यवधीचे नुकसान झाल्याने मुलुंडच्या ५२ वर्षीय केतन कुमार मनसुखलाल दोशी यांनी एक्स्प्रेससमोर उडी घेत आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी घडली. या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. केतन कुमार दोशी (५६) असे त्यांचे नाव आहे. पोलिसांना घटनास्थळावर कोणतीही सुसाईड नोट आढळली नाही.
मुलुंडच्या अंतरिक्ष इमारतीत दोशी हे कुटुंबीयांसोबत राहायचे. त्यांनी २४ तारखेला मुलुंडच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वरून सीएसएमटीहून कन्याकुमारीला जाणाऱ्या एक्स्प्रेससमोर उडी घेत आत्महत्या केली.

Web Title: One of the suicides due to stock market loss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.