Join us

उघड्या गटारात पडल्याने एक जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2021 15:41 IST

गटारांवरील झाकणे चोरीला जाणे, तुटणे असे प्रकार नेहमीचेच आहेत.

ठळक मुद्देगटारांवरील झाकणे चोरीला जाणे, तुटणे असे प्रकार नेहमीचेच आहेत. त्यातच गटारांवर वाहने उभी असल्याने सुद्धा झाकणे तुटतात. यातूनच गटारात पडून मृत्यू वा जखमी होण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत

मीरारोड - मीरा भाईंदर महापालिका आणि नगरसेवकांच्या उदासीनते मुळे गटारांवरील झाकणे नसल्याने पर्यंत काहींचा मृत्यू तर काहीजण जखमी झालेले असताना देखील पालिकेचे दुर्लक्ष सुरूच  त्यातूनच गुरुवारी झाकण नसलेल्या चेंबर मध्ये पडून तरुण जखमी झाल्याची घटना मीरारोड येथे घडली. पावसामुळे रामदेवपार्क परिसरात रस्त्यावर पाणी साचले होते . त्यावेळी तेथून जात असलेल्या समर खान (२५) नावाच्या तरुणाचा गटाराच्या चेंबर वरील झाकण तुटलेले असल्याने गटारात पडून तो जखमी झाला . त्याला नजीकच्या रुग्णालयात नेले असता पायाला जखम झाल्याने पाच टाके घालावे लागले.

गटारांवरील झाकणे चोरीला जाणे, तुटणे असे प्रकार नेहमीचेच आहेत. त्यातच गटारांवर वाहने उभी असल्याने सुद्धा झाकणे तुटतात. यातूनच गटारात पडून मृत्यू वा जखमी होण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. मोकाट गुरं सुद्धा गटारात पडून जखमी होत असतात. नगरसेवक, पालिका अधिकारी यांचे दुर्लक्ष कारणीभूत असल्याचा आरोप नागरिक करत असतात. 

 

टॅग्स :मुंबई