मुंबई : विकिपीडियावर छत्रपती संभाजी महाराजांचे प्रोफाइल संपादित करून त्यात मजकूर टाकणाऱ्या व्यक्तीविरुद्ध महाराष्ट्र सायबर पोलिसांनी रत्नहस्तिन नामक व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. प्रोफाइलमध्ये ‘अपमानास्पद’ तपशील नमूद केला आहे. यापूर्वी महाराष्ट्र सायबर कडून विकिपीडियाला मजकूर हटविण्याबाबत तीन समन्सही बजाविण्यात आले होते.
सायबर महाराष्ट्रने विकिपीडिया फाउंडेशनला नोटीस जारी करत हा मजकूर तातडीने हटविण्याची विनंती केली होती. मात्र, विकिपीडियाकडून काहीच प्रतिसाद आला नाही. रतनहस्तिन या व्यक्तीची ओळख शोधण्याचा प्रयत्न करत असल्याचे सायबर पोलिसांनी सांगितले. शुक्रवारी सायबर विभागाने माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा नोंदवला.