रोह्यात हाणामारीत एकाचा खून

By Admin | Updated: June 9, 2014 01:42 IST2014-06-09T01:42:40+5:302014-06-09T01:42:40+5:30

शहरातील एका ताडी माडी विक्री केंद्रावर झालेल्या किरकोळ बाचाबाचीमुळे नशेच्या आहारी गेलेल्या दोघांनी संगनमत करुन त्यांच्याच एकाला बेदम मारहाण करुन त्याचा खून केला

One murdered in Roha | रोह्यात हाणामारीत एकाचा खून

रोह्यात हाणामारीत एकाचा खून

रोहा : शहरातील एका ताडी माडी विक्री केंद्रावर झालेल्या किरकोळ बाचाबाचीमुळे नशेच्या आहारी गेलेल्या दोघांनी संगनमत करुन त्यांच्याच एकाला बेदम मारहाण करुन त्याचा खून केला. या दोन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
शहरातील एका ताडी माडी विक्री केंद्रावर दुपारच्यावेळी शिवाजी वाकोटे, सजन शिंदे, राजू दुर्वे (तिघेही मूळ राहणार गुलबर्गा, कर्नाटक) हे ताडी माडी पीत असताना त्यांच्यात आपसात शाब्दीक बाचाबाचीचा प्रकार घडला. त्यानंतर तिघेही अष्टमी शंकराच्या मंदीरासमोरील मोकळ्या जागेत राहण्यास गेले. यावेळी आरोपी सजन शिंदे, राजू दुर्वे यांनी शिवाजी वाकोटे याला हाताबुक्क्याने ठार मारले. पोलिसांनी आरोपींना अटक करुन त्यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला. तपास पो. नि. संजय धुमाळ तपास करीत आहेत. (वार्ताहर)

Web Title: One murdered in Roha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.