Join us  

‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’वरील टोलसाठी निविदा सादर करण्यास एक महिन्याची मुदत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2019 3:54 AM

Mumbai-Pune Expressway Update : अभ्यासासाठी कंपन्यांनी मागितला होता अवधी

मुंबई : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील टोल गोळा करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत (एमएसआरडीसी) एजन्सीची नेमणूक करण्यात येणार आहे. यासाठी निविदा प्रक्रियाही सुरू करण्यात आली असून यासाठी पाच कंपन्यांनी रस दाखवला आहे, मात्र आणखी अभ्यास करण्यासाठी एक महिन्याचा कालावधी वाढवून देण्याची मागणी कंपन्यांकडून करण्यात आली होती. त्यानुसार आता एक महिना म्हणजे ५ आॅक्टोबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे.यापूर्वी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील टोल गोळा करण्याचे काम आयआरबी कंपनीला २००४ मध्ये देण्यात आले होते. आता पुन्हा नव्याने नेमण्यात येणाऱ्या प्रक्रियेमध्ये आयआरबीनेही सहभाग घेतला आहे. १० नोव्हेंबरपर्यंत एमएसआरडीसीला नवीन टोल कलेक्शन एजन्सी नेमायची आहे. २००४ मध्ये देण्यात आलेल्या कंत्राटावेळी पंधरा वर्षांमध्ये ९०० कोटी रुपये इतका महसूल जमा होईल, असा अंदाज बांधण्यात आला होता, मात्र वाहनचालकांना सोयीचा ठरणाºया मार्गावर चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे पुढील अकरा वर्षांच्या कालावधीसाठी टोल जमा करण्याच्या कंत्राटासाठी किमान ९३०० कोटी रुपये महसूल मिळेल, असा एमएसआरडीसीला विश्वास आहे. एमएसआरडीसीला मिळणाºया महसुलातून मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर पायाभूत सुविधा विकासाची कामे करण्यात येतील. त्यासाठी ७ हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

टॅग्स :मुंबई-पुणे एक्सप्रेस वे