एक लाख कुटुंबांना शौचालयेच नाहीत
By Admin | Updated: October 10, 2014 00:00 IST2014-10-10T00:00:37+5:302014-10-10T00:00:37+5:30
शासन अनुदानात प्राधान्यक्रम असलेल्या ठाणे, पालघर जिल्ह्यांच्या आदिवासी, दुर्गम भागांतील सुमारे एक लाख दारिद्र्यरेषेखालील कुटुंबे अद्यापही वैयक्तिक शौचालयाच्या लाभापासून वंचित आहेत.

एक लाख कुटुंबांना शौचालयेच नाहीत
ठाणे : शासन अनुदानात प्राधान्यक्रम असलेल्या ठाणे, पालघर जिल्ह्यांच्या आदिवासी, दुर्गम भागांतील सुमारे एक लाख दारिद्र्यरेषेखालील कुटुंबे अद्यापही वैयक्तिक शौचालयाच्या लाभापासून वंचित आहेत. ‘मिशन स्वच्छ भारत’ या अभियानासह जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या राष्ट्रीय स्वच्छता मोहिमेद्वारे या शौचालयांची कामे करण्याची मागणी होत आहे.
जिल्हा परिषदेद्वारे २३ आॅक्टोबरपर्यंत गावपाड्यांत राष्ट्रीय स्वच्छता अभियानाची अंमलबजावणी सुरू आहे. याशिवाय, केंद्रीय पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्या माध्यमातून ‘मिशन स्वच्छ भारत’ अभियान ठाणे व पालघर जिल्हा परिषदांच्या कार्यक्षेत्रात सुरू आहे. या पंधरवड्यात अन्य भागांत स्वच्छतेचे काम करीत असताना १०० टक्के अनुदानाचा लाभ दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना देऊन त्यांच्या शौचालयाचे बांधकाम पूर्ण करण्याची मागणी ग्रामस्थ व आदिवासी कुटुंबांकडून होत आहे.