आंतरराष्ट्रीय विमानतळावर दीड किलो सोने जप्त
By Admin | Updated: July 15, 2015 02:09 IST2015-07-15T02:09:58+5:302015-07-15T02:09:58+5:30
परदेशातून बेकायदेशीरपणे आयात केलेले ३३ लाखांचे १३४८ ग्रॅम सोने मंगळवारी पहाटे पोलिसांनी जप्त केले. विशेष म्हणजे विमानतळावरील सुरक्षा अधिकाऱ्याच्या

आंतरराष्ट्रीय विमानतळावर दीड किलो सोने जप्त
मुंबई: परदेशातून बेकायदेशीरपणे आयात केलेले ३३ लाखांचे १३४८ ग्रॅम सोने मंगळवारी पहाटे पोलिसांनी जप्त केले. विशेष म्हणजे विमानतळावरील सुरक्षा अधिकाऱ्याच्या संगनमताने ही चोरटी आयात सुरू होती. या अधिकाऱ्यांसह दोघांना अटक करण्यात आली आहे.
दीपक गोलानी व सुनील जगवानी अशी आरोपींची नावे असून, गोलानी हा एतिहाद एअरवेज कंपनीचा सुरक्षा अधिकारी आहे. गोलानीने अशा प्रकारे चार वेळा परदेशातून सोन्याची चोरटी आयात केली असल्याचे तपासातून स्पष्ट झाल्याचे विमानतळावरील सुरक्षा यंत्रणांकडून सांगण्यात आले.
अबुधाबीहून आंतरराष्ट्रीय विमानतळावर आलेल्या ईवाय-२१२ या विमानातून उतरलेला प्रवासी सुनील जगवानीची झडती घेतली असता त्याच्याकडील सिगारेटच्या पाकिटात लपविलेले १,३४८ ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या बिस्किटाचे तुकडे व बार मिळाले. त्याची एकूण किंमत ३३ लाख ८ हजार इतकी आहे. चौकशीमध्ये त्याने हे सोने आपण सुरक्षा अधिकारी गोलानीकडे देत असल्याचे सांगितले. दोघांतील व्हॉट्सअॅप मॅसेज, फोन रेकार्ड आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेजवरून त्याचे संगनमत असल्याचे उघडकीस आले. परदेशातून सोने आयात करण्याच्या या वर्षात १८ केसेस करण्यात आल्या आहेत. (प्रतिनिधी)