मुलुंड येथील अपघातात दुचाकीस्वार ठार, एक जण जखमी
By Admin | Updated: May 3, 2014 14:53 IST2014-05-03T13:23:36+5:302014-05-03T14:53:34+5:30
मुलुंड येथे पूर्व द्रृतगती महामार्गावर बाईकवरचा ताबा सुटून झालेल्या अपघातात माझ मोहम्मद याकुब अन्सारी (२५) हा तरु ण जागीच ठार झाला

मुलुंड येथील अपघातात दुचाकीस्वार ठार, एक जण जखमी
मुंबई : मुलुंड येथे पूर्व द्रृतगती महामार्गावर बाईकवरचा ताबा सुटून झालेल्या अपघातात माझ मोहम्मद याकुब अन्सारी (२५) हा तरु ण जागीच ठार झाला तर एक जण जखमी झाला. मृत तरु ण भिवंडी येथील रहिवाशी आहे.
महाराष्ट्र दिनानिमित्त असलेली सुटी मुंबईतील नातेवाईकांकडे साजरी करून अन्सारी हा आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास भाऊ मोहम्मद अनास इब्राहिम अन्सारी (२७) सोबत बाईकवरून घरी येण्यासाठी निघाला होता. मुलुंड पूर्व द्रृतगती महामार्गावरून भिवंडीच्या दिशेने जात असताना अतिवेगाने गाडी चालवित असलेल्या माझ मोहम्मदचा बाइकवरचा ताबा सुटला आणि ते एका विजेच्या खांबावर धडकले. या अपघातात माझ मोहम्मद जागीच ठार झाला तर भाऊ इब्राहिम हा जखमी झाला. घटनास्थळी दाखल झालेल्या नवघर पोलिसांनी त्यांना मुलुंड (पूर्व) येथील सावरकर रु ग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी दाखल करण्यापूर्वीच माझ मोहम्मद अन्सारी मृत झाल्याचे घोषित केले तर इब्राहिम रूग्णालयात उपचार घेत आहे. याप्रकरणी नवघर पोलिस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करीत माझ मोहम्मदचा मृतदेह शवविच्छेदनासाठी राजावाडी रु ग्णालयात पाठविण्यात आल्याची माहिती नवघर पोलिसांनी दिली.