Join us

बेस्ट बसच्या धडकेत एकाचा मृत्यू , दोन जण जखमी, कारचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2020 03:34 IST

रविवारी सायंकाळी सव्वासात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. बेस्ट बस चालक निष्काळजीपणे सुसाट जात असताना त्याचे बसवरील नियंत्रण सुटले आणि दुचाकीस्वारासह दोन कारना धडक देत बस पुढे गेली. या

मुंबई : सेनापती बापट मार्गावरील उड्डाणपुलावर मिनी बेस्ट बसवरील नियंत्रण सुटल्याने बसने दुचाकी चालकासह दोन कारना धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला तर दोन्ही कार दुभाजकावर धडकल्याने कारचे चालक जखमी झाले.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी सव्वासात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. बेस्ट बस चालक निष्काळजीपणे सुसाट जात असताना त्याचे बसवरील नियंत्रण सुटले आणि दुचाकीस्वारासह दोन कारना धडक देत बस पुढे गेली. यात दुचाकी चालक अनिकेत रेवाळे याचा जागीच मृत्यू झाला आहे. तो सांताक्रुझ येथील रहिवाशी होता. यात, दोन्ही कार चालक जखमी झाले आहे. तर दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहेत. या अपघातामुळे उड्डाणपुलावर वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी जखमीना रुग्णालयात दाखल केले. बेस्टच्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

टॅग्स :अपघातमुंबई