वाशीमध्ये हॉटेलला लागलेल्या आगीत एक ठार
By Admin | Updated: August 9, 2014 02:12 IST2014-08-09T02:12:45+5:302014-08-09T02:12:45+5:30
वाशीमधील व्ॉटोन हाऊस हॉटेलला पहाटे सव्वाचार वाजण्याच्या सुमारास आग लागली. यामध्ये सलमान खान (25) या तरुणाचा मृत्यू झाला आहे.

वाशीमध्ये हॉटेलला लागलेल्या आगीत एक ठार
>नवी मुंबई : वाशीमधील व्ॉटोन हाऊस हॉटेलला पहाटे सव्वाचार वाजण्याच्या सुमारास आग लागली. यामध्ये सलमान खान (25) या तरुणाचा मृत्यू झाला आहे. 31 जण जखमी झाले असून त्यामध्ये दोन रशियन नागरिकांचा समावेश आहे. जखमींमध्ये बहुतांश अॅक्सीस बँकेचे कर्मचारी आहेत.
पामबीच रोडवर वाशी सेक्टर 26 मधील कोपरी गावनजीक व्ॉटोन हॉटेल व लॉजिंग बोर्डिगची तीन मजली इमारत आहे. पहाटे सव्वाचार वाजता वातानुकूलित यंत्रणोमध्ये शॉर्टसर्किट होऊन हॉटेलमध्ये आग लागली. काही क्षणात आग सर्व खोल्यांमध्ये पसरली. वाशी अगिAशमन दलाच्या पाच फायर इंजिनांच्या सहाय्याने आग आटोक्यात आणली. आगीमध्ये हॉटेलमधील तीनही मजल्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सलमान खान हा युवक गंभीर भाजल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला आहे.
सदर हॉटेलमध्ये अॅक्सीस बँकेचे सेमिनार आयोजित केले होते. यासाठी उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश व इतर ठिकाणावरून कर्मचारी आले होते. पहाटे आग लागल्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. अनेकांनी खिडक्यांमधून बाहेर उडय़ा मारल्या. तब्बल 31 जण जखमी झाले आहेत. यामधील दहा जणांवर महापालिकेच्या वाशी येथील प्रथम संदर्भ रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्यांना सोडण्यात आले. 21 जणांना रुग्णालयात दाखल केले.
यामधील तिघांना फोर्टीज रुग्णालयात हलविण्यात आले होते. (प्रतिनिधी)
जखमी : वेलीयन शेयव (रशियन नागरिक), अभिनव श्रीवास्तव, रोनक सिंग, ओमप्रकाश भोले, कृष्णा काव, जयेंद्र सिंग, शबाना शाबू, रोनक पोचा, पंकज पारनक, सुरज शर्मा, रवींद्र जसपाल, राजेश साबू, यश शुक्ला, मोहम्मद मुस्तगीर, कपीर पोरमार, पंकज यादव, गुरदीप रावत, अंकीत शर्मा, गजेश प्वेल, सौरभ, फियोद, वेदप्रकाश तिवारी, अब्दुल शोर, हार्दिक पटेल, विकास शर्मा, दीपक शर्मा, कुलदीप पवार, राहुल माहे, राजेश सारंग यांचा समावेश आहे.
तिस:या मजल्यावर अडकलेल्या 1क् जणांची जवानांनी सुटका केली.
-विजय राणो,
मुख्य अग्निशमन अधिकारी, महापालिका
याविषयी हॉटेल व्यवस्थापनाविरोधात नियमाप्रमाणो कारवाई करण्यात येणार आहे.
-माया मोरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, एपीएमसी