जुहू चौपाटीवर वीज पडून एकाचा मृत्यू
By मनोहर कुंभेजकर | Updated: September 28, 2023 21:45 IST2023-09-28T21:45:17+5:302023-09-28T21:45:49+5:30
मुंबई - आज दुपारी वाजता वीजांच्या कडकडाटासह मुंबईत पाऊस पडला होता.यावेळी दुपारी 4 च्या सुमारास छोट्या गणेश मूर्तीचे जुहू ...

जुहू चौपाटीवर वीज पडून एकाचा मृत्यू
मुंबई - आज दुपारी वाजता वीजांच्या कडकडाटासह मुंबईत पाऊस पडला होता.यावेळी दुपारी 4 च्या सुमारास छोट्या गणेश मूर्तीचे जुहू कोळीवाडा, पंड्या लेन येथे जुहूच्या समुद्रात विसर्जन करण्यासाठी किनारी उभा असताना जुहू कोळीवाडा, पंड्या लेन येथे हसन युसुफ शेख (20) राहणार सांताक्रूझ पूर्व,वाकोला याच्याअंगावर वीज पडून त्याचा मृत्यू झाला.
यावेळी जीवरक्षक निलेश बाईत व आदित्य तांडेल उपस्थित होते.त्यांनी 108 ऍम्ब्युलन्सला बोलावून त्याला जीवरक्षक व सांताक्रूझ पोलिस ठाण्याच्या पोलिसनी कूपर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी मृत म्हणून घोषित केले.