माटुंगा येथील बस अपघातात एकाचा मृत्यू

By Admin | Updated: May 22, 2017 03:51 IST2017-05-22T03:51:08+5:302017-05-22T03:51:08+5:30

बोरीवलीहून रत्नागिरीकडे जाणारी खासगी बस माटुंगा येथे उलटल्याची घटना रविवारी पहाटे ५ च्या सुमारास घडली. या दुर्घटनेत ३४ जण जखमी झाले

One died in a bus accident in Matunga | माटुंगा येथील बस अपघातात एकाचा मृत्यू

माटुंगा येथील बस अपघातात एकाचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : बोरीवलीहून रत्नागिरीकडे जाणारी खासगी बस माटुंगा येथे उलटल्याची घटना रविवारी पहाटे ५ च्या सुमारास घडली. या दुर्घटनेत ३४ जण जखमी झाले, तर रामकृष्ण नाडर (३८) या प्रवाशाचा दुर्घटनेत मृत्यू झाला. सायन रुग्णालयात या अपघातील २७ जखमींना दाखल करण्यात आले. त्यापैकी २४ जखमींवर उपचार करून डिस्चार्ज देण्यात आला. तीन जखमींवर उपचार सुरू आहेत. संतोष कापकुले, मुथ्थू रामकृष्ण आणि वणिता वझे अशी त्यांची नावे आहेत, तर केईएम रुग्णालयात आठ जखमींना दाखल करण्यात आले. त्यापैकी सात जणांवर उपचार करत, त्यांना डिस्चार्ज दिला. एका जखमीवर उपचार सुरू आहेत. या अपघातामुळे वाहतूककोंडी झाली होती.

Web Title: One died in a bus accident in Matunga