कार्बन मोनोआॅक्साइडमुळे एकाचा मृत्यू
By Admin | Updated: September 23, 2014 02:02 IST2014-09-23T02:02:09+5:302014-09-23T02:02:09+5:30
घरातील कार्बन मोनोआॅक्साइड सिलिंडरमधून मोनोआॅक्साइडची गळती झाल्याने एकाचा मृत्यू झाल्याची घटना शहाबाज येथे घडली तर एकाला बाधा झाली.

कार्बन मोनोआॅक्साइडमुळे एकाचा मृत्यू
नवी मुंबई : घरातील कार्बन मोनोआॅक्साइड सिलिंडरमधून मोनोआॅक्साइडची गळती झाल्याने एकाचा मृत्यू झाल्याची घटना शहाबाज येथे घडली तर एकाला बाधा झाली.
शहाबाज गाव येथील अभिषेक सोसायटीमध्ये राहणाऱ्या विनित शर्मा याने वडोदरा येथून कार्बन मोनोआॅक्साइडचा सिलिंडर कुरियरने मागवला होता. त्यानुसार हा सिलिंडर राहत्या घरामध्येच ठेवला होता. शनिवारी रात्री या सिलिंडरमधून गळती झाली आणि संपूर्ण घरामध्ये कार्बन मोनोआॅक्साइड पसरला. हा वायू श्वासाद्वारे शर्मा याच्या शरीरात गेल्याने त्याचा मृत्यू झाला. यावेळी घरामध्ये इतर तिघेही झोपलेले होते. त्यापैकी एकाला कसली बाधा झाली नसून श्रवणकुमार परमगुरू याला काही प्रमाणात बाधा झाली. त्याला उपचार करुन रुग्णालयातून सोडून देण्यात आले आहे. मात्र ही आत्महत्या आहे की दुर्घटना याचा तपास सुरू असल्याचे साहाय्यक पोलीस आयुक्त विवेक मासाळ यांनी सांगितले. तसेच शर्मा याने हा सिलिंडर कशासाठी कुरियरने मागवला होता याचाही तपास सुरू आहे. याप्रकरणी एनआरआय पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)