कचरापेटीत सापडले एक दिवसाचे बाळ

By Admin | Updated: January 13, 2017 07:16 IST2017-01-13T07:16:59+5:302017-01-13T07:16:59+5:30

कचरापेटीत एक दिवसाचे जिवंत बाळ सापडल्याची घटना अंधेरीत गुरुवारी घडली.

One day's baby found in the trash | कचरापेटीत सापडले एक दिवसाचे बाळ

कचरापेटीत सापडले एक दिवसाचे बाळ

मुंबई : कचरापेटीत एक दिवसाचे जिवंत बाळ सापडल्याची घटना अंधेरीत गुरुवारी घडली. या प्रकरणी डी.एन. नगर पोलिसांनी अनोळखी पालकांवर गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध सुरू आहे.
अंधेरी पश्चिमेकडील जमात खाना परिसरात एका कचरापेटीजवळ एक तान्हे बाळ स्थानिकांना आढळले. पोलिसांनी बाळाला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला उपचारार्थ कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले.
हे बाळ नुकतेच जन्मलेले असल्याचे डी.एन. नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक धनाजी नलावडे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: One day's baby found in the trash