पंधरवडय़ातून एक दिवस पाणीपुरवठा बंद
By Admin | Updated: November 15, 2014 22:53 IST2014-11-15T22:53:22+5:302014-11-15T22:53:22+5:30
पाण्याची बचत होण्याच्या दृष्टिकोनातून लघुपाटबंधारे विभागाने कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रचा पाणीपुरवठा आता 15 दिवसांतून एकदा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे

पंधरवडय़ातून एक दिवस पाणीपुरवठा बंद
कल्याण : पाणीपुरवठा सुरळीत होण्याच्या अनुषंगाने तसेच पाण्याची बचत होण्याच्या दृष्टिकोनातून लघुपाटबंधारे विभागाने कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रचा पाणीपुरवठा आता 15 दिवसांतून एकदा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ही अंमलबजावणी 31 डिसेंबर 2क्14 र्पयत करण्याची सूचना महापालिकेला केली आहे.
उपलब्ध पाणीसाठय़ाचे पुढील पावसाळ्यार्पयत नियोजन करण्याकरिता हे आदेश देण्यात आले आहेत. उल्हास नदीतून पाणी उचलणा:या संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांना पंधरवडय़ातून एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार, केडीएमसी त्यांच्या परिक्षेत्रतील पाणीपुरवठा 18 नोव्हेंबर, 2 डिसेंबर, 16 डिसेंबर आणि 3क् डिसेंबर 2क्14 या दिवशी म्हणजेच मंगळवारी 24 तास बंद ठेवणार आहे. मोहिली, टिटवाळा, नेतिवली या जलशुद्धीकरण केंद्रांतून होणारा पाणीपुरवठा बंद ठेवला जाणार असल्याची माहिती केडीएमसीचे पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता तरुण जुनेजा यांनी दिली. (प्रतिनिधी)