मुलीवरील लैंगिक अत्याचारप्रकरणी एकाला अटक
By Admin | Updated: January 19, 2015 00:38 IST2015-01-19T00:38:42+5:302015-01-19T00:38:42+5:30
मालवणी परिसरात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी शेजारीच राहणाऱ्या ४७ वर्षीय इसमास मालवणी पोलिसांनी शनिवारी अटक केली आहे.

मुलीवरील लैंगिक अत्याचारप्रकरणी एकाला अटक
मुंबई: मालवणी परिसरात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी शेजारीच राहणाऱ्या ४७ वर्षीय इसमास मालवणी पोलिसांनी शनिवारी अटक केली आहे.
पीडित मुलगी नऊ वर्षांची आहे. आरोपी इसम हा तिच्या घराशेजारीच राहतो. दोन दिवसांपूर्वी त्याने तिच्यावर घरात कोणी नसताना लैंगिक अत्याचार केले होते. या घटनेनंतर मुलीच्या पोटात वेदना जाणवू लागल्या. तेव्हा आईने विचारपूस करताच घडलेला प्रकार उघडकीस आला. ही माहिती मिळताच स्थानिकांनी आरोपीला मारहाण करून पोलिसांच्या हवाली केले. मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनंतर मालवणी पोलिसांनी बलात्कार आणि बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवून त्याला अटक केली. रविवारी त्याला सत्र न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. (प्रतिनिधी)