वाळू चोरी प्रकरणी एकास अटक

By Admin | Updated: May 19, 2014 04:47 IST2014-05-19T04:47:45+5:302014-05-19T04:47:45+5:30

महाड औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुंबई - गोवा महामार्गावरील नांगलवाडी फाटा रोडवर विनापरवाना वाळूची वाहतूक करणारा डम्पर चालक साईनाथ चंद्रकांत मोहिते

One arrested for sand theft case | वाळू चोरी प्रकरणी एकास अटक

वाळू चोरी प्रकरणी एकास अटक

बिरवाडी : महाड औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुंबई - गोवा महामार्गावरील नांगलवाडी फाटा रोडवर विनापरवाना वाळूची वाहतूक करणारा डम्पर चालक साईनाथ चंद्रकांत मोहिते, वय-२८, रा. शिंदेवाडी रिलायन्स पंपसमोर, ता. खेड, जि. रत्नागिरी याला १७ मे, २०१४ रोजी रात्रौ ११.३५ वा. अटक करण्यात आली आहे. याबाबत महाड औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्याकडून दिलेल्या माहितीनुसार वरील तारखेस वेळी व ठिकाणी आरोपीने आपल्या ताब्यातील टाटा डम्पर नं. एमएच ०८/एच २७८६ हिचे कागदपत्र जवळ न बाळगता विनापरवाना (रेती) वाळू रॉयल्टी नसताना सापे येथून वाळूची चोरी करुन नियमापेक्षा ६० टन ७७५ किलो जादा वाळू रेती अशी एकूण १७ टन ७७५ किलो भरुन मौजे सापे ते खेड अशी वाहतूक मुंबई - गोवा महामार्गावर करीत असताना नांगलवाडी फाटा येथे आढळून आल्याने पोलीस शिपाई रणजित प्रभाकर नागे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी विरोधात नोंद करण्यात आली आहे. या कारवाईमध्ये पोलिसांनी डम्पर जप्त केला असून आरोपीला महाड येथील न्यायालयात हजर केले आहे. सहाय्यक पो. नि. अशोक मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली पो. नाईक बी. एस. दाभाडे हे पुढील तपास करीत आहेत. महाड औद्योगिक वसाहत पोलिसांनी वाळू चोरी प्रकरणी एकास अटक करुन डम्पर देखील जप्त केला आहे. मात्र वाळू चोरी प्रकरणाकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे या घटनेनंतर समोर आले असून रॉयल्टी नसताना शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडविणार्‍यांविरोधात महाडचे तहसीलदार, प्रांताधिकारी नेमकी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (वार्ताहर)

Web Title: One arrested for sand theft case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.