Join us
Daily Top 2Weekly Top 5

बनावट कॅनेडियन व्हिसासह एकाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 07:05 IST

बनावट कॅनेडियन व्हिसासह एकाच्या मुसक्या आवळण्यात सहार पोलिसांना शनिवारी यश मिळाले. या कारवाईत सय्यद लियाकत (२१, गुजरात) नामक व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.

मुंबई : बनावट कॅनेडियन व्हिसासह एकाच्या मुसक्या आवळण्यात सहार पोलिसांना शनिवारी यश मिळाले. या कारवाईत सय्यद लियाकत (२१, गुजरात) नामक व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.गुजरातच्या बोरसादमध्ये पालकांसोबत तो राहातो. तेथे तो त्याच्या वडिलांचा व्यवसाय सांभाळतो. शनिवारी इमिग्रेशन विभागाने त्याला ताब्यात घेत, सहार पोलिसांच्या स्वाधीन केले. त्याच्याकडे असलेल्या बनावट व्हिसाच्या आधारे तो कॅनडाला निघाला असताना, त्याला संबंधितांनी रोखले. बारावीचे शिक्षण पूर्ण केल्यावर कॅनडाला फिरायला जाण्याची इच्छा लियाकतने पालकांना सांगितली. तेव्हा दिल्लीमध्ये राहणाऱ्या शर्मा नावाच्या पासपोर्ट एजंटच्या ते संपर्कात आले. त्याने आठ लाख रुपये घेऊन कॅनेडियन व्हिसा बनवून दिला.लियाकतला कॅनडाला नेमके का जायचे होते, तसेच त्याने कोणा शर्मा नामक पासपोर्ट एजंटला इतकी मोठी रक्कम दिलीय का, यातील सत्य आम्ही पडताळून पाहत आहोत, असे तपास अधिकाºयाचे म्हणणे आहे.

टॅग्स :बातम्यामहाराष्ट्र