बोगस दस्त व्यवहार प्रकरणी एकास अटक

By Admin | Updated: June 9, 2014 00:22 IST2014-06-09T00:22:34+5:302014-06-09T00:22:34+5:30

बनावट दस्तऐवज व बोगस कर्जदार उभा करून मयत इसमाच्या नावे २५ लाख रू. चे कर्ज घेऊन ते अन्य इसमास दिल्याप्रकरणी पतपेढी संचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

One arrested in the case of bogus fraud | बोगस दस्त व्यवहार प्रकरणी एकास अटक

बोगस दस्त व्यवहार प्रकरणी एकास अटक

नायगांव : बनावट दस्तऐवज व बोगस कर्जदार उभा करून मयत इसमाच्या नावे २५ लाख रू. चे कर्ज घेऊन ते अन्य इसमास दिल्याप्रकरणी पतपेढी संचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावरुन एकाला अटक करण्यात आली.
याप्रकरणी १७ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून कायदेशीर सल्लागार असलेले अ‍ॅड. पिटर थॉमस फर्नांडीस (६४, रा. करमाळेवाडी तामतलाव) यांना रविवारी अटक करण्यात आली. संत जोसेफ पतपेढीच्या वडवली शाखेतून लडकु नामा महाडीक या मयत इसमाच्या नावे अन्य बोगस इसम उभा करून सर्व व्यवहार करण्यात आल्याचे उघड झाले होते.
ही कर्जाची रक्कम घेऊन त्याचे वाटप अन्य इसमांना करून फसवणूक केल्याप्रकरणी वसई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. फर्नांडीस याला पालघर न्यायालयात सादर केले असता १२ जूनपर्यंत या इसमास पोलीस कोठडी देण्यात आली.
याप्रकरणी अन्य १६ संचालकांसह अन्य इसमांना अटक होण्याची शक्यता आहे. प्रत्यक्षात कर्ज दुसऱ्यास देऊन व्यक्ती मात्र तिसरीच उभी करण्याची प्रकरणे वाढत असून याबाबत कारवाईची मागणीही केली जात आहे, या प्रकरणानंतर अशाच प्रकारे कर्जाच्या माध्यमातून फसवणूक घडल्याची अन्य प्रकरणेही बाहेर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे, या प्रकरणाचा अधिक तपास स. पो. नि. हणमंत ओऊळकर करीत आहेत. ग्रामीण भागात जमिनीचे गैरव्यवहरही अशाप्रकारे वाढले असून जमिनींचे दर वाढल्याने बोगस व्यवहार अधिक प्रमाणात होत आहेत. (वार्ताहर)

Web Title: One arrested in the case of bogus fraud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.