दीड कोटीचे सोने जप्त
By Admin | Updated: February 12, 2015 01:16 IST2015-02-12T01:16:23+5:302015-02-12T01:16:23+5:30
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर ग्राऊंड स्टाफ म्हणून काम करणाऱ्या रोहन सुरेश सुर्वे या तरूणाला कस्टमच्या एअर इंटेलीजन्स युनीटने(एआययु) बुधवारी तब्बल दीड कोटींच्या सोन्यासह पकडले.

दीड कोटीचे सोने जप्त
मुंबई : छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर ग्राऊंड स्टाफ म्हणून काम करणा-या रोहन सुरेश सुर्वे या तरूणाला कस्टमच्या एअर इंटेलीजन्स युनीटने(एआययु) बुधवारी तब्बल दीड कोटींच्या सोन्यासह पकडले. बँकॉकहून चोरटया मार्गाने आलेले हे सोने सुर्वे सुरक्षितपणे विमानतळाबाहेर काढण्याच्या प्रयत्नात होता.
एआययुने बँकॉकहून आपल्यासोबत सोने आणणारा प्रवासी किरकुमार चौधरीलाही अटक केलुी आहे. चौकशीदरम्यान त्याने अनेक बँकॉकवाऱ्या केल्याचे स्पष्ट झाले आहे. इव्हेन्ट मॅनेजर असल्याची माहिती त्याने एआययु अधिकाऱ्यांना दिली आहे. त्याची शहानिशा होणार आहे. तसेच चौधरी स्वत: ही तस्करी करतो की तस्करी करणाऱ्या अांतरराष्ट्रीय टोळीसाठी कॅरिअर(सोन्याची ने-आण करणारा) म्हणून काम करतो याबाबतही एआयूने तपास सुरू केला आहे.
चौधरीने विमानतळावर उतरताच सुर्वेची भेट घेतली. स्वत:कडील सोने त्याच्या ताब्यात दिले व विमानतळाबाहेर ठरलेल्या ठिकाणी त्याची वाट पाहू लागला. सुर्वे विमानतळावरील कर्मचारी असल्याने त्यांना आत-बाहेर करण्यासाठी वेगळे मार्ग आहेत. शिवाय या मार्गांवर त्यांची फारशी झाडाझडतीही होत नाही. त्यामुळे हे सोने सुरक्षितपणे विमानतळाबाहेर काढू आणि चौधरीला देऊ या विचारात असलेल्या सुर्वेला एआययुने पकडलेच. (प्रतिनिधी)