Join us
Daily Top 2Weekly Top 5

मरिन ड्राईव्हजवळ बुडालेल्या दोघांपैकी एकाचा मृत्यू; दुसऱ्याचा शोध सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2019 21:05 IST

दुपारी दोनच्या सुमारास घडली दुर्घटना

मुंबई: भरतीच्या वेळी मरिन ड्राईव्हजवळ असलेल्या समुद्रात बुडालेल्या दोघांपैकी एकाला बाहेर काढण्यात यश आलं. मात्र रुग्णालयात डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. समुद्रात बुडालेल्या दुसऱ्या व्यक्तीचा शोध सुरू आहे. दुपारी दोनच्या सुमारास दोन जण मरिन ड्राईव्ह जवळच्या समुद्रात बुडाल्याची घटना घडली. त्यांच्या बचावासाठी नौदल, पोलीस आणि अग्निशमन दलाचं पथक दाखल झालं. पोलिसांनी सुरुवातीला दोरीच्या सहाय्यानं दोघांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र तो निष्फळ ठरला. रात्री साडेआठच्या सुमारास एकाला बाहेर काढण्यात यश आलं. मात्र त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. सध्या दुसऱ्या व्यक्तीच्या सुटकेसाठी घटनास्थळी बचाव कार्य सुरू आहे. मृत पावलेल्या आणि सध्या शोध सुरू असलेल्यांची ओळख अद्याप पटलेली नाही.