Join us
Daily Top 2Weekly Top 5

नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दीवर्षानिमित्त उद्या देशभरात स्वच्छता अभियानाचं आयोजन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2022 23:06 IST

संपूर्ण मुंबई आणि महाराष्ट्रासह भारतात विविध ठिकाणी स्वच्छता अभियान राबवण्यात येणार

पद्मश्री डॉ. श्री. आप्पासाहेब धर्माधिकारी आणि रायगडभूषण डॉ. सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनातून महाराष्ट्रभूषण डॉ. ति. श्री. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दीवर्षानिमित्त संपूर्ण मुंबई आणि महाराष्ट्रासह भारतात विविध ठिकाणी स्वच्छता अभियान आणि रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलं आहे.

सदर स्वच्छता अभियान मुंबईत विविध ठिकाणी दि. 27 फेब्रुवारी 2022 रोजी करण्यात येणार असून दि.1 मार्च 2022 रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलं आहे. रक्तदान शिबिर वडाळा 5 गार्डन, टाटा मेमोरिअल हॉस्पिटल, वरळी, बोरिवली अशा अनेक ठिकाणी होणार आहे. सदर रक्तदान शिबिर टाटा मेमोरियल हॉस्पिटल परळ येथेदेखील होणार आहे. या रक्तदान शिबिरात प्रतिष्ठानचे हजारो स्वयंसेवक आणि स्वच्छता अभियानमध्ये लाखो स्वयंसेवक सहभागी होणार आहेत. यानिमित्ताने जन जागृतीचं एक महान कार्य हाती घेण्यात आलं आहे.