Join us

ऐन रविवारी मुंबईकरांचा होणार खोळंबा; मध्य रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2024 09:32 IST

वडाळा रोड आणि मानखुर्द दरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्गावर सकाळी ११ ते सायंकाळी ४ पर्यंत  ब्लॉक आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मध्य रेल्वे मार्गावर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी माटुंगा ते मुलुंड दरम्यान रविवारी अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ वाजेपर्यंत मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. तर वडाळा रोड आणि मानखुर्द दरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्गावर सकाळी ११ ते सायंकाळी ४ पर्यंत  ब्लॉक आहे.

ब्लॉक कालावधीत वडाळा रोड आणि मानखुर्द स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्ग बंद राहील. सीएसएमटी येथून सकाळी १०.०३ ते दुपारी ३.५४ वाजेपर्यंत वाशी-बेलापूर-पनवेलसाठी सुटणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा आणि वाशी-बेलापूर-पनवेल येथून सकाळी ९.४० ते दुपारी ३.२८ वाजेपर्यंत सीएसएमटीकरिता सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील. दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-वांद्रे-गोरेगाव सेवांवर कोणताही परिणाम होणार नाही, अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली. 

ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते वांद्रे / गोरेगाव दरम्यानच्या उपनगरीय रेल्वे सेवा वेळापत्रकानुसार धावतील. ब्लॉक कालावधीत पनवेल ते मानखुर्द दरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील. 

हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत सकाळी १० ते दुपारी ४.३० वाजेपर्यंत ट्रान्स हार्बर लाईन आणि मेन लाईनवरून प्रवास करण्याची परवानगी आहे.

डाऊन धिमा मार्ग

- ब्लॉकपूर्वी शेवटची लोकल टिटवाळा आहे. सीएसएमटी येथून सकाळी ९.५३ वाजता सुटेल.

- ब्लॉकनंतर पहिली लोकल आसनगाव आहे. सीएसएमटी येथून दुपारी ३.३२ वाजता सुटेल.अप धिमा मार्ग

- ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल ठाणे येथून सकाळी १०.२७ वाजता सुटेल.

- ब्लॉकनंतर पहिली लोकल ठाणे येथून दुपारी ४.०३ वाजता सुटेल.

डाऊन हार्बर मार्ग

- ब्लॉकपूर्वी पनवेलसाठी शेवटची लोकल सीएसएमटी येथून सकाळी ९.५२ वाजता सुटेल. पनवेल येथे ११.१२ वाजता पोहोचेल.

- ब्लॉकपूर्वी पनवेलसाठी शेवटची लोकल वडाळा रोड येथून सकाळी १०.१४ वाजता सुटेल. ११.१६ वाजता पनवेल येथे पोहोचेल.

- ब्लॉकनंतर पनवेलसाठी पहिली लोकल सीएसएमटी येथून सायंकाळी ४ वाजता सुटेल. सायंकाळी ५.२१ वाजता पनवेल येथे पोहोचेल.

अप हार्बर मार्ग

- सीएसएमटीसाठी ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल पनवेल येथून सकाळी ९.२८ वाजता सुटेल. सीएसएमटी येथे सकाळी १०.४८ वाजता पोहोचेल.

- सीएसएमटीसाठी ब्लॉकनंतर पहिली लोकल बेलापूर येथून दुपारी ३.४७ वाजता सुटेल. सीएसएमटी येथे ४.५१ वाजता पोहोचेल.

- ब्लॉकनंतर पहिली लोकल पनवेल येथून दुपारी ३.४५ वाजता सुटेल. सीएसएमटी येथे सायंकाळी ५.०४ वाजता पोहोचेल.

 

टॅग्स :मध्य रेल्वेहार्बर रेल्वे