Join us

"२२ जानेवारीला मुंबईतील प्रत्येक घरात दिवे उपलब्ध करून घ्या"

By मनोहर कुंभेजकर | Updated: January 8, 2024 19:23 IST

भाजयुमोने जिल्हा नियोजन समितीत केली मागणी. 

मुंबई- दि, २२ जानेवारी रोजी श्री रामजन्मभूमी मंदिरातील प्राणप्रतिष्ठेच्या शुभमुहूर्तावर  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तमाम देशवासियांना राम ज्योती दिवा लावण्याची विनंती केली आहे. त्यामुळे मुंबई उपनगरातील रहिवाशांना श्री राम ज्योती प्रज्वलित करण्यासाठी दिवे उपलब्ध होण्यासाठी कुंभारवाडा किंवा मुंबईच्या महिला बचत गटाच्या माध्यमातून जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून दिवे उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी आज  मुंबई उपनगर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत समितीचे सदस्य व भारतीय जनता युवा मोर्चा मुंबईचे अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवाना यांनी समितीचे अध्यक्ष आणि मुंबई उपनगराचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या कडे मागणी केली.

पालकमंत्र्यांनी तिवाना यांच्या या मागणीला सहमती दर्शवली असून त्यावर विचार केला जाईल असे सांगितले.

टॅग्स :भाजपा