Join us
Daily Top 2Weekly Top 5

Omicron Variant : मुंबईत ओमायक्रॉनचा धोका, जिनोम सिक्वेन्सिंग चाचणीत आढळले ५५ टक्के रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2022 05:59 IST

Omicron Variant : कस्तुरबा रुग्णालयातील प्रयोगशाळा व पुणेस्थित राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने या सातव्या चाचणी तुकडीचा भाग म्हणून कोविड बाधा झालेल्या एकूण ३७६ रुग्णांच्या नमुन्यांची चाचणी केली.

मुंबई : कस्तुरबा रुग्णालयात कोविड-१९ विषाणूच्या सातव्या जिनोम सिक्वेन्सिंग चाचणीत मुंबईतील २८२ बाधित रुग्णांच्या नमुन्यांचा अभ्यास करण्यात आला. यामध्ये ‘ओमायक्रॉन’चे तब्बल १५६ म्हणजे ५५ टक्के रुग्ण आढळल्याचे चिंताजनक बाब समोर आली आहे. यामुळे मुंबईत ओमायक्रॉनच्या सामूहिक संसर्गाचा धोका दिसून येत आहे. यातील १५६ पैकी केवळ नऊ रुग्णांना रुग्णालयात उपचाराची गरज भासली असल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

कस्तुरबा रुग्णालयातील प्रयोगशाळा व पुणेस्थित राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने या सातव्या चाचणी तुकडीचा भाग म्हणून कोविड बाधा झालेल्या एकूण ३७६ रुग्णांच्या नमुन्यांची चाचणी केली. यातील २८२ रुग्ण हे मुंबई महानगरातील नागरिक आहेत. त्यामुळे या २८२ नमुन्यांसंदर्भातील निष्कर्ष शुक्रवारी जाहीर करण्यात आला. यात ‘डेल्टा व्हेरिएंट’चे १३ टक्के, ‘डेल्टा डेरिव्हेटिव्ह’चे ३२ टक्के तर ‘ओमायक्रॉन’चे ५५ टक्के रुग्ण आढळले आहेत. 

- ओमायक्रॉन विषाणूची बाधा झालेल्या १५६ पैकी फक्त नऊ जणांनाच रुग्णालयात दाखल करावे लागले. यापैकी कोणालाही लक्षणे आढळली नाहीत. तसेच त्यांना ऑक्सिजन पुरवठा किंवा अतिदक्षता विभागातही दाखल करावे लागले नाही.- २८२ पैकी फक्त १७ जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले. यापैकी पहिला डोस घेतलेले फक्त तीन जण रुग्णालयात दाखल आहेत. दोन्ही डोस घेतलेल्यांपैकी अवघे १० जण रुग्णालयात दाखल आहेत. लसीचा एकही डोस न घेतलेल्या ८१ पैकी चार जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.- डेल्टा डेरिव्हेटिव्ह बाधित दोघांनाच अतिदक्षता उपचारांची गरज भासली. यापैकी एका डेल्टा डेरिव्हेटिव्ह बाधित रुग्णाचा मृत्यू झाला. ही व्यक्ती ६० वर्षांपेक्षा अधिक वयाची होती. त्यांना मधुमेह व उच्च रक्तदाबाचाही त्रास होता.

२८२ रुग्णांचे वयोगटनिहाय वर्गीकरण - ० ते २० वर्षे  - ४६ रुग्ण (१६ टक्के)  - २१ ते ४० वर्षे - ९९ रुग्ण (३५ टक्के)- ४१ ते ६० वर्षे - ७९ रुग्ण (२८ टक्के)- ६१ ते ८० वर्षे - ५४ रुग्ण (१९ टक्के)- ८१ ते १०० वर्षे - ४ रुग्ण (१ टक्का)

टॅग्स :ओमायक्रॉनमुंबई