Join us

Omicron: मुंबईत १९० रुग्णांपैकी ‘ओमायक्रॉन’चे सुमारे ९५ टक्के रुग्ण, २३ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2022 10:51 IST

१५ जणांनी घेतली नाही लस, एकूण १९० नमुन्यांपैकी २३ नमुने मृत रुग्णांशी संबंधीत संकलित केले आहेत.

मुंबई : मुंबईतील नवव्या तुकडीमध्ये १९० रुग्णांमधील कोविड विषाणू नमुन्यांचा अभ्यास करण्यात आला असून त्याचे निष्कर्ष जाहीर केले आहेत. यात ‘ओमायक्रॉन’चे ९४.७४ टक्के रुग्ण आढळले आहेत. या १९० पैकी २३ रुग्णांचा मृत्यू ओढवला. पैकी २१ रुग्ण हे ६० वर्षांपेक्षा अधिक वयाचे व सहव्याधीग्रस्त होते. एवढेच नव्हे तर या २३ पैकी १५ जणांनी कोविड लसीचा एकही डोस घेतला नव्हता, त्यामुळे कोविड लसीकरण आवश्यक असल्याची बाब पुन्हा स्पष्ट झाली आहे. नवव्या चाचणी तुकडीचा भाग म्हणून कोविड बाधा झालेल्या एकूण २८२ रुग्णांच्या नमुन्यांची चाचणी केली. यातील १९० रुग्ण हे मुंबईतील आहेत. 

एकूण १९० नमुन्यांपैकी २३ नमुने मृत रुग्णांशी संबंधीत संकलित केले आहेत. यापैकी मृत रुग्णांमध्ये ६० ते ८० या वयोगटातील १३, तर ८१ ते १०० या वयोगटातील ८ अशा एकूण २१ नागरिकांचा समावेश आहे. प्रामुख्याने ते सहव्याधीग्रस्तही होते. मृतांपैकी १५ जणांनी लसीचा डोस घेतला नव्हता. 

१९० रुग्णांचे वर्गीकरण (टक्केवारीत प्रमाण)० ते २० वर्षे वयोगट-१७ रुग्ण (९ )२१ ते ४० वर्षे वयोगट-३६ रुग्ण (१९)४१ ते ६० वर्षे वयोगट-४१ रुग्ण (२२)६१ ते ८० वयोगट-७४ रुग्ण (३९)८१ ते १०० वयोगट-२२ रुग्ण (१२)

विषाणू उपप्रकारानुसार वर्गीकरण (टक्केवारीत प्रमाण)ओमायक्रॉन- १८० रुग्ण (९४.७४)डेल्टा व्हेरियंट- ३ रुग्ण (१.५८ )डेल्टा- १ रुग्ण (०.५३ )इतर- ६ रुग्ण (३.१६ )

१९० पैकी १०६ जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले.पहिला डोस घेतलेले ५ जण रुग्णालयात दाखल.दोन्ही डोस घेतलेल्यांपैकी ५० जण रुग्णालयात दाखल.लसीचा एकही डोस न घेतलेले ५१ जण रुग्णालयात दाखल.दाखल १०६ पैकी फक्त ९ जणांना प्राणवायू पुरवठा करावा लागला.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्याओमायक्रॉन