आॅलिम्पिकवीर वीरधवल विवाहबद्ध होणार

By Admin | Updated: June 27, 2017 01:23 IST2017-06-27T01:23:03+5:302017-06-27T01:23:03+5:30

आॅलिम्पिकवीर, अर्जुन पुरस्कार विजेता जलतरणपटू वीरधवल खाडे मुंबईस्थित आंतरराष्ट्रीय जलतरणपटू ऋजुताशी शुक्रवारी (दि. ३०) महासैनिक दरबार हॉल येथे विवाहबद्ध होत आहे.

Olympian Viralwala will get married | आॅलिम्पिकवीर वीरधवल विवाहबद्ध होणार

आॅलिम्पिकवीर वीरधवल विवाहबद्ध होणार

लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : आॅलिम्पिकवीर, अर्जुन पुरस्कार विजेता जलतरणपटू वीरधवल खाडे मुंबईस्थित आंतरराष्ट्रीय जलतरणपटू ऋजुताशी शुक्रवारी (दि. ३०) महासैनिक दरबार हॉल येथे विवाहबद्ध होत आहे.
देशाचा गोल्डन बॉय ठरलेल्या आॅलिम्पिकवीर वीरधवल सध्या महाराष्ट्र शासनाच्या प्रशासकीय सेवेत आहे. त्याने यापूर्वी २००६ साली सहा सुवर्णांसह पाच राष्ट्रीय विक्रमांची नोंद केली होती. यासह त्याने युवा राष्ट्रकुल, आशियाई, राष्ट्रकुल अशा आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धांमध्ये भारताचे अनेक वेळा प्रतिनिधित्व करीत सुवर्णपदके मिळविली आहेत.

Web Title: Olympian Viralwala will get married