दहाव्या मजल्यावरून वृद्धेची आत्महत्या

By Admin | Updated: April 26, 2015 02:29 IST2015-04-26T02:29:28+5:302015-04-26T02:29:28+5:30

वयोवृद्ध पतीच्या आजारपणामुळे मानसिक तणावाखाली असलेल्या रमाबेन मुलजी कतिरा या ६२ वर्षीय वृद्धेने दहाव्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली.

Older suicide due to tenth floor | दहाव्या मजल्यावरून वृद्धेची आत्महत्या

दहाव्या मजल्यावरून वृद्धेची आत्महत्या

मुलुंडमधील धक्कादायक घटना : मानसिक ताणामुळे मारली खिडकीतून उडी
मुंबई : वयोवृद्ध पतीच्या आजारपणामुळे मानसिक तणावाखाली असलेल्या रमाबेन मुलजी कतिरा या ६२ वर्षीय वृद्धेने दहाव्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी सकाळी मुलुंडमध्ये घडली.
पोलिसांच्या माहितीनुसार, कतिरा दाम्पत्य कुटुंबासह मुलुंड पश्चिमेकडील विकास पॅराडाइजच्या दहाव्या मजल्यावर राहत होते. दीड वर्षापूर्वी ८० वर्षांच्या मुलजी यांना अर्धांगवायूचा झटका आला. त्यामुळे रमाबेन मानसिकरीत्या खचल्या. त्यांच्यावर उपचारही सुरू होते. सकाळी आठच्या सुमारास मंदिरात जाऊन येते, असे सांगून त्या घराबाहेर पडल्या. घराचे दार बंद करून त्यांनी मजल्यावरील उघड्या खिडकीतून खाली उडी मारली. जखमी अवस्थेतच कुटुंबीयांनी रमाबेन यांना इमारतीच्या सुरक्षारक्षक आणि शेजाऱ्यांच्या मदतीने मुलुंडच्या अग्रवाल रुग्णालयात दाखल केले; मात्र त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात धाडला.

Web Title: Older suicide due to tenth floor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.