फेसबुकवर जुन्या फोटोंचा ‘नॉस्टेल्जिया’
By Admin | Updated: December 21, 2015 01:38 IST2015-12-21T01:38:38+5:302015-12-21T01:38:38+5:30
फेसबुकवर युझर्सने अपलोड केलेल्या सर्वांत पहिल्या फोटोची पुन्हा एकदा आठवण करून देण्यात येत आहे. युझर्सने फेसबुक वापरण्यास सुरुवात केल्यावर सर्वांत पहिला अपलोड केलेला फोटो

फेसबुकवर जुन्या फोटोंचा ‘नॉस्टेल्जिया’
मुंबई : फेसबुकवर युझर्सने अपलोड केलेल्या सर्वांत पहिल्या फोटोची पुन्हा एकदा आठवण करून देण्यात येत आहे. युझर्सने फेसबुक वापरण्यास सुरुवात केल्यावर सर्वांत पहिला अपलोड केलेला फोटो फेसबुक एका अॅपच्या माध्यमातून पुन्हा एकदा ‘रिपोस्ट’ करण्याची संधी देत आहे. या माध्यमातून जगभरातील युझर्स आपल्यात झालेला बदल पाहत हा फोटो पुन्हा फेसबुक अकाउंटवर पोस्ट करून जुन्या आठवणींचा ‘नॉस्टेल्जिया’ अनुभवत आहेत.
२०१५ हे वर्ष संपण्यास अवघा दीडएक आठवडा राहिला असताना ‘2015 रिव्ह्यू’ असा फेसबुकने तात्पुरता पर्याय उपलब्ध केला असून, त्याद्वारे युझर्सना वर्षभराचा प्रवास फोटोंच्या माध्यमातून एका क्लिकवर दिसतो. शिवाय, ही वर्षभराची फोटोजेनिक जर्नी फेसबुकच्या माध्यमातून शेअर करून आपल्या मित्रपरिवारांनाही काही खास क्षणांची आठवण करून देता येते. सध्या फेसबुक युझर्स या पर्यायांकडे आकर्षिले जात असून, बरेच युझर्स याचा वापर करीत असल्याचे दिसून येत आहे.
याशिवाय, फेसुबकच्या माध्यमातून एका विशिष्ट अॅपद्वारे युझर्सना २०१५मधील आपल्या आयुष्यातील महत्त्वाची व्यक्ती कोण? याचेही उत्तर सहज सापडू शकते, तसेच त्या व्यक्तीच्या फोटोसह ती पोस्ट शेअर करण्याची संधी युझर्सकडे उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे, आपल्या फ्रेंड्सपैकी आपल्याशी भांडणारे, रागावणारे, चिडणारे मित्र-मैत्रिणी कोण हेसुद्धा या अॅपद्वारे शोधून युझर्सना पोस्ट करता येते.