वृद्धेची सोनसाखळी हिसकावणाऱ्याला अंधेरी पोलिसांकडून अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:06 IST2021-07-30T04:06:38+5:302021-07-30T04:06:38+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : वृद्धेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावत पळ काढणाऱ्या चोराला स्थानिकांनी पकडत अंधेरी पोलिसांच्या स्वाधीन केले. बुधवारी ...

वृद्धेची सोनसाखळी हिसकावणाऱ्याला अंधेरी पोलिसांकडून अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : वृद्धेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावत पळ काढणाऱ्या चोराला स्थानिकांनी पकडत अंधेरी पोलिसांच्या स्वाधीन केले. बुधवारी हा प्रकार घडला असून, चोरीला गेलेला मुद्देमालही हस्तगत केला आहे.
अंधेरी पूर्वच्या श्री वरदविनायक एसआरए सोसायटीत विमल पांडुरंग पांढरे (७०) या राहतात. इमारतीच्या जिन्याजवळच त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून पळत असताना चोराचा पाठलाग स्थानिक तरुण प्रतीक उतेकर, अनिश गोरुले, मंगेश यादव यांनी केला. त्यांनी चोराला पकडून नंतर अंधेरी पोलिसांच्या स्वाधीन केले. तपास अधिकाऱ्यांनी चोराने लपवून ठेवलेली सोनसाखळी शोधत ती जप्त केली आहे.
दरम्यान, चोराला पकडणाऱ्या तीनही तरुणांचा संभाजी नगरमधील रहिवाशांतर्फे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय बेळगे, कुलकर्णी यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
(फोटो : सोनसाखळी चोराला पकडणाऱ्या तरुणांचे कौतुक अंधेरी पोलिसांनी केले.)