वयोवृद्ध बापाचे हाल करणारा 'तो' आता तुरुंगाची हवा खाणार !

By पूनम अपराज | Updated: July 12, 2018 20:32 IST2018-07-12T20:29:32+5:302018-07-12T20:32:53+5:30

 मुलाविरोधात शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात  गुन्हा दाखल  

The old man's father 'now' will be in jail! | वयोवृद्ध बापाचे हाल करणारा 'तो' आता तुरुंगाची हवा खाणार !

वयोवृद्ध बापाचे हाल करणारा 'तो' आता तुरुंगाची हवा खाणार !

पूनम अपराज

 

मुंबई - दादर पश्चिम येथे वयोवृद्ध वडिलांना मारहाण करून जेवण हिसकावून घेणाऱ्या मुलाविरोधात शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात आई - वडील आणि ज्येष्ठ नागरिक चरितार्थ व कल्याणासाठी कायदा, कलम २४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

वृद्धापकाळात आई वडिलांची सेवा करण्याऐवजी एका मुलाने चक्क आपल्या वयोवृद्ध वडिलांना मारहाण केली आणि त्यांच्या समोरील जेवणाचे ताट अनेकदा हुसकावून घेतले आहे. दादरमधील उच्चभ्रू घरात हि घटना घडली आहे. ज्येष्ठ नागरिक असलेले शब्बीर काचवाला (वय - ६८) हे दादर येथील सिल्व्हर बीच या इमारतीत राहतात. शब्बीर यांची स्वतःची फॅक्टरी होती असून ती सध्या बंद पडलेली आहे अशी माहिती शिवाजी पार्क पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूर्यकांत गायकवाड यांनी दिली. शब्बीर यांनी स्वतःच्या मुलाविरोधात तक्रार दाखल केली आहे. मुलाचे नाव जहीर असून तो बेरोजगार आहे. तो सतत मारहाण करून जेवण काढून घेतो असा आरोप शब्बीर यांनी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीत केला आहे. त्यानुसार आम्ही आई - वडील आणि ज्येष्ठ नागरिक चरितार्थ व कल्याणासाठी कायदा, कलम २४ अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील चौकशी सुरु असल्याचे गायकवाड यांनी पुढे सांगितले. 

Web Title: The old man's father 'now' will be in jail!

टॅग्स :Mumbaiमुंबई