रस्ता ओलांडताना भरधाव वाहनाच्या धडकेत वृद्धेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 04:08 IST2020-12-02T04:08:10+5:302020-12-02T04:08:10+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : चेंबूरमध्ये रस्ता ओलांडताना ६७ वर्षीय वृद्धेचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी रात्री घडली. याप्रकरणी चेंबूर ...

An old man died in a head-on collision while crossing the road | रस्ता ओलांडताना भरधाव वाहनाच्या धडकेत वृद्धेचा मृत्यू

रस्ता ओलांडताना भरधाव वाहनाच्या धडकेत वृद्धेचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : चेंबूरमध्ये रस्ता ओलांडताना ६७ वर्षीय वृद्धेचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी रात्री घडली. याप्रकरणी चेंबूर पोलिसांनी चालकाला अटक केली आहे.

चेंबूरच्या सिंधी कॅम्प परिसरात राहणाऱ्या शकुंतला अंभीरे (६७) असे मृत महिलेचे नाव आहे. सोमवारी रात्री साडेआठ ते नऊच्या सुमारास सी.जी. गिडवानी मार्ग येथून रस्ता ओलांडत असताना भरधाव वाहनाच्या धडकेत त्या जखमी झाल्या. त्यांना तत्काळ जवळच्या रुग्णालयात नेले. तेथे उपचाराआधीच त्यांचा मृत्यू झाल्याचे निदान डाॅक्टरांनी केले. अंभीरे यांच्या मुलाच्या तक्रारीवरून पोलिसांनी चालकाविरुद्ध गुन्हा नोंदवत अधिक तपास सुरू केला आहे.

Web Title: An old man died in a head-on collision while crossing the road