तोतया पोलिसांकडून वृद्धाची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:11 IST2021-01-13T04:11:14+5:302021-01-13T04:11:14+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : पोलीस असल्याची बतावणी करत चोरी होत असल्याची भीती घालून वृद्धाच्या अंगावरील दागिने लुटल्याप्रकरणी अँटॉपहिल ...

तोतया पोलिसांकडून वृद्धाची फसवणूक
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पोलीस असल्याची बतावणी करत चोरी होत असल्याची भीती घालून वृद्धाच्या अंगावरील दागिने लुटल्याप्रकरणी अँटॉपहिल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार पोलीस अधिक तपास करत आहेत.
सायन परिसरात राहणारे ७० वर्षीय प्रभुदास हे बँकेतून सेवानिवृत्त झाले आहेत. सायन कोळीवाडा परिसरात गेले असताना ठगांनी त्यांना अडवून पोलीस असल्याची बतावणी केली. तसेच पुढे चोरीच्या घटनांत वाढ झाल्याचे सांगत, सोनसाखळी काढून खिशात ठेवण्यास सांगितले. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून प्रभुदास यांनी गळ्यातील सोनसाखळी काढून खिशामध्ये ठेवली. त्यानंतर ही सोनसाखळी रुमालामध्ये व्यवस्थित बांधून देण्याच्या नावाखाली ठग सोनसाखळी घेऊन पसार झाले. त्यांनी हातातील रुमाल तपासताच त्यात दागिने नव्हते. यात फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दिली.