सिडकोच्या जुन्या घरांचे स्लॅब कोसळले

By Admin | Updated: April 14, 2016 00:21 IST2016-04-14T00:21:37+5:302016-04-14T00:21:37+5:30

येथील सेक्टर-५ मधील केएल-२ टाईपमधील दोन घरांचे मंगळवारी मध्यरात्री स्लॅब कोसळले. त्यामध्ये कोणी राहत नसल्याने जीवितहानी टळली. दीड महिन्यात ही दुसरी घटना घडली असल्याने सुरक्षितते

Old house slab of CIDCO collapsed | सिडकोच्या जुन्या घरांचे स्लॅब कोसळले

सिडकोच्या जुन्या घरांचे स्लॅब कोसळले

कळंबोली : येथील सेक्टर-५ मधील केएल-२ टाईपमधील दोन घरांचे मंगळवारी मध्यरात्री स्लॅब कोसळले. त्यामध्ये कोणी राहत नसल्याने जीवितहानी टळली. दीड महिन्यात ही दुसरी घटना घडली असल्याने सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. सिडकोकडून कोणतीच उपाययोजना होत नसल्याने परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. या घटनेचा पोलिसांनी पंचनामा केला आहे.
या इमारतींना मोठ्या प्रमाणात तडे गेले आहेत. सिडकोने यापैकी ठरावीकच इमारती धोकादायक म्हणून घोषित केल्या आहेत. त्याच्या पुनर्विकासाचे भिजत घोंगडे अद्यापही शासन दरबारी पडून आहे. प्रस्ताव गेल्या कित्येक वर्षांपासून धूळ खात असल्याने स्थानिक रहिवाशांना जीव मुठीत धरून राहावे लागत आहे. मंगळवारी मध्यरात्री इमारत क्र मांक ३० मधील दोन खोल्यांमधील छताचा स्लॅब अचानक कोसळला. घर खाली असल्याने जीवितहानी झाली नाही. सकाळी ९.३० वाजता ही घरे उघडल्यानंतर स्लॅब कोसळल्याची माहिती मिळाली. त्यानंतर असोसिएशनचे अध्यक्ष आत्माराम पाटील यांनी सिडको आणि कळंबोली पोलीस ठाण्यात तक्रार दिली. दीड महिन्यापूर्वी याच इमारतीत राहणाऱ्या संजय मोरे यांचे कुटुंब गाढ झोपेत असताना स्लॅब कोसळला होता. त्यांची पत्नी सीमा आणि मुलगा सुयश जखमी झाले होते. वारंवार तक्र ारी देऊन सिडको दुर्लक्ष करीत आहे. स्लॅब कोसळून येथे मरण्यापेक्षा सिडको कार्यालयासमोर उपोषण केलेले बरे, अशी संतप्त प्रतिक्रि या आत्माराम पाटील यांनी दिली.

कार्यकारी अभियंत्यांना घटनास्थळी पाठवून त्वरित पाहणी करून वरिष्ठ कार्यालयाला अहवाल सादर करण्यात येईल. संबंधित ठिकाणच्या रहिवाशांना इमारती खाली करण्याकरिता नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. मात्र उलवे या ठिकाणी जाण्याकरिता रहिवासी नकार देत आहेत. के.एल.-२ इमारतीच्या पुनर्विकासाकरिता वरिष्ठ पातळीवर हालचाली सुरू झाल्या आहेत.
- किरण फणसे, अधीक्षक अभियंता, सिडको

Web Title: Old house slab of CIDCO collapsed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.