Join us

Ola Uber Strike: तर दोन दिवसांनी 'मातोश्री'वर मोर्चा काढू, ओला-उबर चालकांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2018 22:40 IST

ओला-उबरच्या संपामुळे गेले अकरा दिवस मुंबईकरांना मनस्ताप सहन करावा लागल्यानंतर, अ‍ॅप बेस टॅक्सीच्या संपाबाबत महत्त्वाची

मुंबई - ओला आणिउबर टॅक्सीचालकांनी आता आपला मोर्चा मातोश्रीवर वळवणार असल्याचे म्हटले आहे. ओला, उबर टॅक्सीचालकांच्या संपावर लवकर तोडगा न काढल्यास दोन दिवसांनी मातोश्रीवर मोर्चा काढणार असल्याचा इशारा संघटनेकडून देण्यात आला आहे. परिवहनमंत्री दिवाकर रावतेंना दोन दिवसांचा अल्टीमेटम ओला-उबर टॅक्सीचालक संघटनांकडून देण्यात आला आहे.  

ओला-उबरच्या संपामुळे गेले अकरा दिवस मुंबईकरांना मनस्ताप सहन करावा लागल्यानंतर, अ‍ॅप बेस टॅक्सीच्या संपाबाबत महत्त्वाची बैठक गुरुवारी पार पाडली होती. मात्र, अद्यापही याबाबत तोडगा निघाला नाही. त्यामुळे शिवसेना नेते असल्याने दिवाकर रावतेंना लक्ष्य करत मातोश्रीवर मोर्चा काढणार असल्याचा इशारा संपकरी संघटनेनं दिला आहे.  प्रतिकिलोमीटर दरवाढीसह मुळ भाडेवाढ, राइड टाइम या आणि मागण्या पूर्ण करण्याबाबत लेखी आश्वासन मिळत नसल्यामुळे अ‍ॅप बेस्ड टॅक्सीचालक गेल्या 11 दिवसांपासून संपावर आहेत.

शहरातील ओला-उबर व्यवस्थापनाच्या गलथान कारभाराच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाच्या नेतृत्वाखाली सुमारे हजारो अ‍ॅप बेस्ड टॅक्सी चालक-मालकांनी 22 ऑक्टोबरपासून संप पुकारला आहे. मंगळवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास ओला-उबर व्यवस्थापनाशी बैठक संपल्यानंतर, संघाचे सरचिटणीस गोविंद मोहिते यांनी सांगितले की, मागण्या पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन मिळाल्यानंतरच संप मागे घेण्यात येईल. बैठकीत काही मागण्यांच्या पूर्ततेसाठी वरिष्ठांना विचारावे लागेल, अशी भूमिका ओला-उबर प्रतिनिधींनी घेतली. दरम्यान, यापूर्वी बुधवारी दुपारी काही चालक-मालक यांनी संपाबाबत तोडगा काढण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली.

टॅग्स :ओलाउबरशिवसेनासंप