अधिका-यांची चौकशी
By Admin | Updated: September 13, 2014 00:19 IST2014-09-13T00:19:34+5:302014-09-13T00:19:34+5:30
पालिका एलबीटी विभागातील गैरव्यवहार प्रकरणी अतिरिक्त आयुक्तांसह कर्मचाऱ्यांची चौकशी होणार असून १४ हजारांपैकी फक्त १०५ व्यापाऱ्यांच्या व्यवहारांचे पूर्ण निर्धारण झाले आहे

अधिका-यांची चौकशी
उल्हासनगर : पालिका एलबीटी विभागातील गैरव्यवहार प्रकरणी अतिरिक्त आयुक्तांसह कर्मचाऱ्यांची चौकशी होणार असून १४ हजारांपैकी फक्त १०५ व्यापाऱ्यांच्या व्यवहारांचे पूर्ण निर्धारण झाले आहे. शहरात ७० टक्के माल बिलांविना येत असल्याचा आरोप महासभेत नगरसेवकांनी केला़
एलबीटीऐवजी जकात आणण्याच्या प्रस्तावावर वादळी चर्चा झाली असून नगरसेवकांनी पालिका अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप केल्याने आयुक्त बालाजी खतगावकर यांना गोंधळात हस्तक्षेप करून महासभा सभाशास्त्रानुसार चालवण्याची विनंती नगरसेवकांना करावी लागली. सत्ताधारी पक्षाच्या सभागृह नेता व विरोधी पक्ष नेता यांच्याकडून प्रस्ताव येणे अपेक्षित असताना ऊठसूट कोणताही नगरसेवक प्रस्ताव आणत असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.
(प्रतिनिधी)