अधिका:यांसह नगरसेवकांना टॅब

By Admin | Updated: December 8, 2014 23:49 IST2014-12-08T23:49:50+5:302014-12-08T23:49:50+5:30

महासभा, स्थायी समितीसह अन्य बैठकांची माहिती नगरसेवक व अधिका:यांना तत्काळ मिळण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

Officers: including the Councilors tab | अधिका:यांसह नगरसेवकांना टॅब

अधिका:यांसह नगरसेवकांना टॅब

घोडबंदर : ठाणो महापालिकेचा प्रशासकीय कारभार गतिमान होण्याबरोबर महासभा, स्थायी समितीसह अन्य बैठकांची माहिती नगरसेवक व अधिका:यांना तत्काळ मिळण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी नगरसेवक व अधिकारी यांच्यासाठी 16क् टॅब खरेदी करण्यात आले आहेत. त्याचे वाटप लवकरच करण्यात येणार आहे. यामुळे कागदपत्रंचा वापर न करताही अतिजलद संवाद साधणो प्रशासनाला शक्य होणार असून आता निमंत्रण मिळाले नाही, अजेंडा मिळाला नाही, तक्र ार प्राप्त झाली नाही, अशी सबब नगरसेवक व अधिका:यांना देता येणार नाही. एकूणच या टॅबमुळे प्रशासकीय कामाला गती प्राप्त होण्याची शक्यता दिसत आहे.
संगणकीय क्रांतीमुळे जग पायाशी आले असल्याने ठाणो महापालिकाही आता हायटेक बनली आहे. पेपरलेस कारभारासाठी प्रशासनाने 2क्12 मध्येच प्रयत्न सुरू केले होते. तत्कालीन स्थायी समिती सदस्यांना 16 लॅपटॉप वाटप करून कामाची सुरु वातही केली होती. परंतु, त्याला अद्याप यश प्राप्त झालेले नाही. ते लॅपटॉप कोणाच्या ताब्यात आहेत, याचीही प्रशासनाकडे माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे आता देण्यात येणारे टॅब कसे सुरक्षित राहणार, असा प्रश्नही उपस्थित होत आहे. लेव्होना कंपनीचे नव्याने विकसित झालेले मॉडेल असलेले 16क् टॅब खरेदी करण्यात आले आहेत. याकरिता एकूण 43 लाख 2क् हजार रु पये खर्च केला आहे. सध्या त्या टॅबमध्ये सॉफ्टवेअर लोड करण्याचे काम सुरू आहे. प्रत्येक अधिकारी, नगरसेवक यांचे मेल आयडी घेण्यात आले असून या मेल आयडीवरून यापुढे कारभार सुरू राहणार आहे. हे टॅब प्रभाग समितीच्या सहायक आयुक्तांमार्फत नगरसेवकांर्पयत पोहोचते केले जाणार आहेत. आगामी महासभेत सर्वाना हे टॅबधारी नगरसेवक दिसतील, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
नगरसेवकांना यापुढे आपल्या प्रभागातील तक्रारींचे पत्र पालिका कार्यालयात घेऊन यावे लागणार नाही. 
ते टॅबद्वारे मेलवरून संबंधित खात्याकडे तक्रार करू शकतात. तक्रारीचे निवारण झाल्याचा मेल अधिकारी नगरसेवकांना पाठविणार आहेत. ब:याचदा आम्हाला तक्र ार किंवा कार्यक्र माचे निमंत्रण मिळाले नसल्याचे कारण सांगून नगरसेवक महासभेत आवाज उठवीत असतात. तसेच, तक्र ार आमच्याकडे आली नाही किंवा कागदपत्रे सापडत नाहीत, असा बहाणा अधिका:यांनाही करता येणार नाही. एकूणच टॅबमुळे नगरसेवक, अधिका:यांना खोटे बोलताच येणार नाही.  (प्रतिनिधी)
 
संगणकीय क्र ांतीमुळे जग पायाशी आले असल्याने ठाणो महापालिकाही आता हायटेक बनली आहे. पेपरलेस कारभारासाठी प्रशासनाने 2क्12 मध्येच प्रयत्न सुरू केले होते. तत्कालीन स्थायी सदस्यांना 16 लॅपटॉप वाटप करून कामाची सुरु वातही केली होती. परंतु, त्याला अद्याप यश प्राप्त झालेले नाही.

 

Web Title: Officers: including the Councilors tab

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.