एका थाळीवर दोन थाळी फ्रीची ऑफर पडली महागात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:05 IST2021-01-01T04:05:52+5:302021-01-01T04:05:52+5:30

नागरिकांना सावधानतेचा इशारा : मुंबई, पुण्यातील प्रसिद्ध हॉटेलच्या नावाने फसवणूक लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : नववर्षानिमित्ताने फेसबुकवरून मुंबई, पुण्यातील ...

The offer of two free plates on one plate was expensive | एका थाळीवर दोन थाळी फ्रीची ऑफर पडली महागात

एका थाळीवर दोन थाळी फ्रीची ऑफर पडली महागात

नागरिकांना सावधानतेचा इशारा : मुंबई, पुण्यातील प्रसिद्ध हॉटेलच्या नावाने फसवणूक

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : नववर्षानिमित्ताने फेसबुकवरून मुंबई, पुण्यातील प्रसिद्ध हॉटेलच्या नावाने एका थाळीवर दोन थाळी फ्रीची ऑफर देण्यात येत आहे. मात्र, याच ऑफरमुळे अनेकांवर खाते रिकामी करण्याची वेळ ओढावली आहे. त्यामुळे अशा कुठल्याही आमिषाला बळी पडू नका, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.

सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑनलाइन ठगांनी नववर्षाच्या स्वागतानिमित्ताने फसवणुकीसाठी ठगांकडून वेगवेगळी शक्कल लढविण्यात येत आहे. यातूनच नववर्षानिमित्त मुंबईतील पाच व पुण्यातील एक प्रसिद्ध हॉटेल/ रेस्टॉरंटमध्ये एका थाळीवर दोन थाळी फ्री अशी ऑफर देत फेसबुक तसेच सोशल मीडियावरून जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. त्यावर विश्वास ठेवून संपर्क साधणाऱ्यांना बुकिंगसाठी एक लिंक पाठवून १० रुपये रक्कम भरण्यास सांगण्यात येत आहे. लिंकवर पैसे भरताच खात्यातून पैसे काढून घेण्यात येत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत.

* ‘गाेपनीय माहिती कुणालाही देऊ नका’

अशाप्रकारच्या कुठल्याच ऑफरवर विश्वास ठेवून लिंक ओपन करू नका, तसेच कुणालाही आपली गोपनीय माहिती शेअर करू नका, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.

.........................

Web Title: The offer of two free plates on one plate was expensive