दोन राजकीय पक्षांच्या प्रमुखांचे आक्षेपार्ह फोटो व्हाॅट्सॲप स्टेटसवर अपलोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:08 IST2021-04-30T04:08:11+5:302021-04-30T04:08:11+5:30
वडाळा टी. टी. पाेलिसांकडून तपास सुरू लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : नगरसेविकेच्या स्वीय सहायकाने राज्यातील दोन राजकीय पक्षांच्या प्रमुखांचे ...

दोन राजकीय पक्षांच्या प्रमुखांचे आक्षेपार्ह फोटो व्हाॅट्सॲप स्टेटसवर अपलोड
वडाळा टी. टी. पाेलिसांकडून तपास सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : नगरसेविकेच्या स्वीय सहायकाने राज्यातील दोन राजकीय पक्षांच्या प्रमुखांचे आक्षेपार्ह फोटो त्याच्या व्हाॅट्सॲप स्टेटसवर अपलोड केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करून वडाळा टी. टी. पोलीस तपास करीत आहेत.
एका राष्ट्रीय पक्षाच्या मुंबईतील नगरसेविकेच्या स्वीय सहायकाने राज्यातील दोन राजकीय पक्षांच्या प्रमुखांचे फोटो एडिट करून ते आक्षेपार्ह फोटो त्याच्या व्हाॅट्सॲप स्टेटसवर अपलोड केले. शिवसेनेच्या कार्यकर्त्याने या व्हाॅट्सॲप स्टेटसच्या फोटोचे स्क्रीनशॉट काढून वडाळा येथील एका विभागाच्या शिवसेना पक्षाच्या व्हाॅट्सॲप ग्रुपवर सोमवारी रात्री आठच्या सुमारास टाकले.
अखेर येथील एका विभागातील शाखाप्रमुखाने वडाळा टी. टी. पोलीस ठाणे गाठून नगरसेविकेच्या ३० वर्षीय स्वीय सहायकाविरोधात जाणीवपूर्वक दुष्ट हेतूने पक्षाच्या कार्यकर्त्यांचा अपमान करून धार्मिक भावना दुखावल्याची तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा नोंद करीत पोलिसांनी अधिक तपास सुरू केला आहे.