महापालिकेच्या कारवाईत अडथळा; माजी नगरसेविकेसह दोघींवर गुन्हा

By Admin | Updated: May 9, 2014 22:34 IST2014-05-09T21:13:29+5:302014-05-09T22:34:56+5:30

घोडबंदर रोड, कासारवडवली परिसरातील पाखंडा गावात जोगींदर रजक यांनी अनधिकृत बांधकाम केले होते.

Obstructing municipal proceedings; Crime against the former corporator, both of them | महापालिकेच्या कारवाईत अडथळा; माजी नगरसेविकेसह दोघींवर गुन्हा

महापालिकेच्या कारवाईत अडथळा; माजी नगरसेविकेसह दोघींवर गुन्हा

ठाणे-घोडबंदर रोड, कासारवडवली परिसरातील पाखंडा गावात जोगींदर रजक यांनी अनधिकृत बांधकाम केले होते. त्या बांधकामांवर गुरुवारी महापालिकेचे अतिक्रमण पथक कारवाई करीत असताना माजी नगरसेविका वनीता गोतपगार आणि अन्य एका महिलेने अडथळा आणून पथकाला शिवीगाळ करीत दमदाटी केली. त्या दोघींविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी महापालिकेच्या माजीवडा मानपाडा विभागाच्या सहाय्यक आयुक्त मृदुला अंडे यांनी केलेल्या तक्रारीनुसार त्या पसार महिलांचा शोध सुरु असल्याची माहिती कासारवडवली पोलिसांनी दिली.
(प्रतिनिधी)

Web Title: Obstructing municipal proceedings; Crime against the former corporator, both of them

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.