उदरनिर्वाहासाठी रोपवाटिकांचा आधार

By Admin | Updated: May 15, 2015 23:23 IST2015-05-15T23:23:00+5:302015-05-15T23:23:00+5:30

कर्जत तालुक्यातील आदिवासींनी आपल्या उदरनिर्वाहाचा आधार शोधला आहे. येथील आदिवासींनी झाडांची रोपे तयार केली आहेत

Nursery base for livelihood | उदरनिर्वाहासाठी रोपवाटिकांचा आधार

उदरनिर्वाहासाठी रोपवाटिकांचा आधार

विजय मांडे, कर्जत
कर्जत तालुक्यातील आदिवासींनी आपल्या उदरनिर्वाहाचा आधार शोधला आहे. येथील आदिवासींनी झाडांची रोपे तयार केली आहेत. डोंगरपाडा येथील पाझर तलावाच्या आणि चिल्हार नदीमधील केटी बंधाऱ्याच्या पाण्याचा वापर करून तब्बल २५ लाख झाडांची रोपे विक्र ीसाठी तयार करण्यात आली आहेत.
कर्जत तालुका फार्महाऊसचा तालुका म्हणून परिचित आहे. त्या फार्महाऊससाठी काय लागते, याचा अभ्यास करून अनेकांनी रोजगार शोधला आहे. शेतघर आणि फार्महाऊस ही संकल्पना प्रत्यक्षात आली तेव्हापासून झाडांना मोठे महत्त्व प्राप्त झाले. याची जाणीव होताच कर्जत तालुक्यात उन्हाळ्यात नदीमध्ये किंवा पाझर तलाव परिसरातील पाण्याचा उपयोग करण्याचा प्रामुख्याने आदिवासी भागातील शेतकरी, मजूर यांचा हेतू सफल झाला. या भागात डोंगरपाडा आणि जांबरुख येथे पाझर तलाव या भागातील पाणीटंचाई लक्षात घेऊन जिल्हा परिषदेने या नदीमध्ये अनेक ठिकाणी सिमेंट केटी बंधारे बांधले आहेत. त्यांचा वापर शेतकऱ्यांनी रोपवाटिका तयार करण्यासाठी केल्याचे जागोजागी दिसून येत आहे. नाल्याच्या अगदी कडेला राहुट्या बांधून त्यांच्या बाजूला रोपवाटिकांच्या बागा फुलविल्या आहेत.

Web Title: Nursery base for livelihood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.