योगाचे शरीराला असंख्य फायदे, कोरोनाच्या काळात योग अभ्यासाचे महत्त्व वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:06 AM2021-06-21T04:06:37+5:302021-06-21T04:06:37+5:30

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये योगाबद्दल मोठ्याप्रमाणावर जनजागृती निर्माण झाली आहे. लॉकडाऊनमुळे दिवसभर घरात बसून राहणे, तसेच वर्क फ्रॉम ...

Numerous benefits of yoga to the body, the importance of yoga practice increased during the Corona period | योगाचे शरीराला असंख्य फायदे, कोरोनाच्या काळात योग अभ्यासाचे महत्त्व वाढले

योगाचे शरीराला असंख्य फायदे, कोरोनाच्या काळात योग अभ्यासाचे महत्त्व वाढले

googlenewsNext

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये योगाबद्दल मोठ्याप्रमाणावर जनजागृती निर्माण झाली आहे. लॉकडाऊनमुळे दिवसभर घरात बसून राहणे, तसेच वर्क फ्रॉम होम यामुळे शरीराची हालचाल जवळपास थांबली आहे. यामुळे नागरिक योगासने, प्रणायाम, मेडिटेशन या योग प्रकारांना प्राधान्य देत आहेत. शरीराचा व्यायाम व्हावा, या उद्देशाने दिवसातून किमान दोनदा तरी नागरिक योग अभ्यास करू लागली आहेत.

सध्या कोरोनाबाधित रुग्णांमध्ये ऑक्सिजन लेवलची कमी मोठ्या प्रमाणात जाणवत आहे, तसेच कोरोनाच्या नव्या स्वरूपामुळे रोगप्रतिकारकशक्तीही अपुरी पडत आहे. योगाचे मानवी शरीराला असंख्य फायदे आहेत. त्यामुळे या कठीण काळात अनेक जणांचा योग हा एकमेव आधार बनला आहे, तर कधीही योग न करणारेही आता इंटरनेट व ऑनलाइन प्रशिक्षणाच्या माध्यमातून योगाभ्यास शिकू लागले आहेत.

तरुणांना योगाभ्यासाबद्दल काय वाटते

पोन्नलगर देवेंद्र - योगासनांचे महत्त्व आज परदेशातही वाढले आहे. सध्याच्या काळात योग हा रोगावर मात करण्यासाठी अत्यंत उत्तम पर्याय ठरत आहे. त्यामुळे सरकारने ही ऑनलाइन पेक्षा प्रत्यक्षरीत्या लोकांपर्यंत पोहोचून योग शिकविण्यास परवानगी द्यायला हवी.

सारिका गीते- भारतीय संस्कृतीत योग अभ्यासाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या आधी नागरिकांना योगा करण्यासाठी विविध माध्यमातून जनजागृती करण्यात येत होती. मात्र, आता कोरोनामुळे योगाचे महत्त्व नागरिकांना समजले आहे. त्यामुळे माझ्या कुटुंबातही प्रत्येक जण योग अभ्यास करत आहे.

सुयोग खंडागळे - शाळेत असल्यापासून मी नियमित प्राणायाम करतो. यामुळे मला विविध आजारांवर मात करण्यासाठी मदत झाली आहे. माझ्या कुटुंबातील व्यक्तींनाही नियमित प्राणायम व योगासने करण्यासाठी मी आग्रही असतो.

निशा ठक्कर (योग प्रशिक्षक) - योगाभ्यासामध्ये मेडिटेशन, रिलॅक्सेशन, योगासन व प्राणायाम यामुळे आपली रोगप्रतिकारकशक्ती वाढते. योगामुळे केवल शारीरिक तंदुरुस्ती नव्हे, तर आपले मानसिक स्वास्थ्यही उत्तम राहते. योगाभ्यास सुरू केल्यानंतर, आपल्या मनातील भीती दूर होऊन आत्मविश्वास देखील वाढतो, तसेच दुसऱ्यामधील आत्मविश्‍वास वाढविण्याचीही आपल्यात क्षमता येते. योगामुळे शरीराची अंतर शुद्धी होते. अनेक जण आजही वेळ नसल्यामुळे योग अभ्यास न करण्याची कारणे देतात. मात्र, तसे न करता, ज्या प्रमाणे आपल्याला अंघोळ करण्याची सवय आहे, त्याचप्रमाणे योग अभ्यासाचीही सवय लावून तो आवर्जून करायला हवा.

Web Title: Numerous benefits of yoga to the body, the importance of yoga practice increased during the Corona period

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.